Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अमेरिकेच्या कारनाम्याने घाबरलाय चीन; अमेरिकन कंपन्यांवरच टाकली बंदी.. पहा, काय आहे प्रकरण ?

दिल्ली : अमेरिकेने तैवानबाबत घेतलेल्या एका निर्णयामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर देत अमेरिकन कंपन्यांवर बंदी घातली आहे. चीनचा शत्रू असलेल्या तैवानला शस्त्रांचा पुरवठा केला म्हणून चीनने लॉकहीड मार्टिन कॉर्प आणि रेथिऑन टेक्नॉलॉजी कॉर्प या अमेरिकन कंपन्यांवर बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 7 फेब्रुवारी रोजी दोन कंपन्यांच्या विरोधात हे निर्बंध टाकले आहेत.

Advertisement

ते म्हणाले, की “अमेरिकन कंपन्यांचे हे पाऊल चीनच्या सुरक्षेचे हितसंबंध खराब करते, चीन-अमेरिका संबंध आणि तैवान सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थिरता गंभीरपणे खराब करते. चीन आणि तैवान यांच्यातील वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. गरज पडल्यास एक दिवस तैवानवर कब्जा करणार असल्याचेही चीनने याआधी अनेक वेळा सांगितले आहे.

Advertisement

“चीनच्या परकीय निर्बंध कायद्यातील संबंधित अटींनुसार, चीन सरकारने रेथिऑन टेक्नॉलॉजीज आणि लॉकहीड मार्टिन या कंपन्यांबाबत हा निर्णय घेतल्याचे वांग वेनबिन यांनी सांगितले. या दोन्ही लष्करी कंपन्या आहेत ज्यांनी चीनच्या तैवान प्रदेशात अमेरिकेच्या शस्त्रास्त्र विक्रीत दीर्घकाळ भाग घेतला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध नेहमीच आव्हानात्मक राहिले आहेत आणि आता तर या दोन्ही देशात तणाव अनेक पटींनी वाढला आहे.

Loading...
Advertisement

शीतयुद्ध होऊन आता बराच काळ लोटला आहे. परंतु दोन्ही बाजूंना भीती आहे की ही एक नवीन सुरुवात असू शकते. चीनच्या संपत्तीमुळे त्याच्या सैन्याचा मोठा विस्तार झाला आहे. ज्याला अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र धोका म्हणून पाहतात. कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे, की त्यांना फक्त आपल्या प्रदेशाचे रक्षण करायचे आहे. तथापि, यामध्ये पूर्व चीन समुद्रातील जपान आणि दक्षिण चीन समुद्रातील आग्नेय आशियाई देशांनी दावा केलेल्या बेटांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे समाविष्ट आहे, ज्यात महत्त्वाचे वाहतूक मार्ग आणि नैसर्गिक संसाधने आहेत.

Advertisement

आधी चीन आता रशिया..! म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान निघालेत रशिया दौऱ्यावर; पहा, काय आहे पाकिस्तानचा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply