Take a fresh look at your lifestyle.

मार्च महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या दिवशी कुठे राहतील बँका बंद..?

मुंबई : देशातील बँका फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मार्च महिन्यातही अनेक दिवस बंद राहणार आहेत. होय, या महिन्यातही बँकांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत होणार आहे. आरबीआयने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. देशातील सर्व बँका एकाच दिवशी बंद राहणार नाहीत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहतील. त्यामुळे मार्च महिन्यात तुम्ही बँकेच्या कामकाजाचे नियोजन करताना कोणत्या दिवशी बँकेला सुट्टी आहे, हे आधीच माहित करुन घ्या. म्हणजे, तुम्हाला अनावश्यक त्रास होणार नाही.

Advertisement

पुढील महिन्यात होळी आणि महाशिवरात्री हे सण येणार आहेत. याबरोबरच मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील महिन्यात संपूर्ण 13 दिवस बँका बंद राहतील, म्हणजेच या दिवशी बँकांचे कोणतेही कामकाज होणार नाही.

Advertisement

वास्तविक, महाशिवरात्री, होळी असे मोठे सण मार्चमध्ये येतात. याशिवाय राज्यातील स्थानिक सुट्ट्या आहेत, त्यामुळेही बँका बंद राहतील. तसेच शनिवार आणि रविवारच्या सार्वजनिक सुट्ट्यांसह या महिन्यात संपूर्ण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

बँकेने अनेक दिवस बँक बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तथापि, ऑनलाइन बँकिंग मात्र सुरुच राहणार आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. राज्यांमध्ये सणांनिमित्त विविध दिवस सुटी असणार आहेत. अनेक राज्ये आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. वास्तविक, बँकिंगच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांतील सणांवरही अवलंबून असतात.

Advertisement

या सुट्ट्यांमध्ये 1 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त आगरताळा, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, दिल्ली, पणजी, पटना शिलाँग वगळता अन्य ठिकाणच्या बँका बंद राहतील. 3 मार्चला फक्त गंगटोक विभागातील बँकांना सुट्टी आहे. 4 मार्च रोजी एजॉल (मिझोराम), 6 मार्च रोजी रविवारी साप्ताहिक सुटी, 12 मार्च रोजी दुसरा शनिवार, 13 मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुटी, 17 मार्च रोजी होळीनिमित्त देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांची येथील बँका बंद राहतील.

Advertisement

18 मार्च रोजी बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता अन्य विभागातील बँका बंद राहतील. 19 मार्च रोजी होळीचा दुसरा दिवस असल्याने भुवनेश्वर, इंफाळ आणि पटना येथील बँका बंद राहतील. 20 मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुट्टी, 22 मार्च रोजी बिहार दिवसनिमित्त पाटणा विभागातील बँका बंद राहतील. 26 मार्च रोजी चौथा शनिवार आहे तर 27 मार्च रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे.

Advertisement

फेब्रुवारी महिन्यातही ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या दिवशी कुठे बँका राहतील बंद..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply