Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज पहिल्याच दिवशी सोन्याने केलीय कमाल.. सोने खरेदीआधी चेक करा आजचे नवीन भाव..

मुंबई : सध्या सोन्या-चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत. तरी देखील सोन्याच्या दराने 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोने 0.01 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेंड करत आहे. तर चांदीचे दर मात्र 0.38 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोनाचे टेन्शन, वाढती महागाई, रशिया-युक्रेन तणाव, रुपयात आलेली कमजोरी आणि मजबूत अमेरिकन डॉलरमुळे 2022 मध्ये सोने दर (Gold Price) 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

एप्रिल डिलीवरी सोन्याची किंमत आज 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 50,119 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. आज चांदी 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड करत आहे. आज सकाळच्या टप्प्यातील हे दर आहेत त्यामुळे दिवसभरात सोन्या चांदीच्या दरात आणखीही बदल होऊ शकतात.

Advertisement

जगभरातील वाढती महागाई आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दर नेहमीच कमी जास्त होत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणावही यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याच्या भाववाढीमागे काही महत्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे महागाई. जगभरात महागाई (inflation) वाढली आहे.

Loading...
Advertisement

अमेरिका, ब्रिटेनसारख्या श्रीमंत देशांनाही महागाईचे चटके बसत आहेत. दुसरीकडे भारतातही किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर अमेरिकेत किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक पातळीवर आहे. त्यानंतर रशिया-युक्रेन तणावाचा (Ukraine Russia Conflict) परिणाम दिसून येत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे, की रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करू शकतो. अमेरिकेने तसा इशाराही दिला आहे. हे संकट पाहता जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत.

Advertisement

खुशखबर.. आज सोन्या-चांदीचे भाव पुन्हा घटले; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply