Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता पेट्रोल-डिझेल, CNG विसरा..! लवकरच येणार हायड्रोजन कार; पहा, कोणत्या कंपनीने केलीय तयारी..

मुंबई : तंत्रज्ञानाच्या बाबतीत ऑटोमोबाइल कंपन्या वेगाने प्रगती करत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर सेमी हायब्रीड आणि पूर्ण हायब्रीड वाहने बनवण्यात येत आहेत. आता ऑटो कंपन्या हायड्रोजन पॉवर फ्युएलवर चालणारी वाहने सादर करत आहेत. जगातील मोठ्या कंपन्या, टोयोटा, ह्युंदाई आणि निकोला सारख्या कंपन्या या इंधनावर चालणारी वाहने बनवत आहेत. याबरोबरच अनेक स्टार्टअप कंपन्याही या कामात सहभागी होत आहेत. फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्टने (Renault) हायड्रोजनवर चालणाऱ्या नवीन कारचा टीझर फोटो पोस्ट केला आहे. Renault ही कार लवकरच सादर करू शकते.

Advertisement

होय, लवकरच कार निर्माता रेनॉल्ट हायड्रोजनवर चालणारी कार (hydrogen car) लाँच करणार आहे. या नवीन कारचा फोटोही कंपनीने पोस्ट केला आहे. कार निर्माता कंपनी ही कार मे 2022 मध्ये सादर करू शकते. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. रेनॉल्टने हायड्रोजनवर आधारित वाहनांमध्ये प्रवेश करण्याचा आपला प्लान उघड केला आहे. कंपनीच्या नवीन योजनेचा भाग म्हणून रेनॉल्टचे लक्ष्य पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या कारची संख्या कमी करण्याचे आहे.

Advertisement

या कारच्या फोटोमध्ये एलइडी हेडलाइट्स दिसत आहेत. ही कॉन्सेप्ट कार कंपनीची इलेक्ट्रिक कार Megane सारखी दिसते. रेग्युलर काचेच्या ऐवजी रेनॉल्ट कॉन्सेप्ट कारचे साइड मिरर फक्त कॅमेर्‍यांसह दिसू शकतात. तथापि, हे तेव्हाच उघड होईल जेव्हा कंपनी कार तीन महिन्यांनंतर सादर करेल, तोपर्यंत केवळ अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. हायड्रोजन कार व्यतिरिक्त कंपनीची आणखी एक योजना आहे. 2035 पर्यंत ICE वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या EU (European Union) च्या धोरणानुसार 2030 पर्यंत संपूर्ण लाइनअप पूर्णपणे इलेक्ट्रिकवर आणण्याची रेनॉल्टची योजना आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान,  इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण होणार नाही, असे म्हटले जात असले तरी बॅटरी खराब झाल्यानंतर ते प्रदूषण देखील करेल. अशा परिस्थितीत फोर्ड (Ford) आणि व्होल्वोने (Volvo) एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. फोर्ड आणि व्होल्वो या दोन वाहन निर्माता कंपन्यांनी इलेक्ट्रिक व्हेइकल बॅटरी रिसायकल (Battery Recycle) करण्यासाठी रेडवुड मटेरिअल नावाचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप जुन्या आणि जीर्ण झालेल्या बॅटरीचे पूर्णपणे रीसायकल करेल. त्यामुळे या बॅटरीद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यात मदत मिळेल.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदूषण थांबणार..! ‘या’ दोन दिग्गज कंपन्या सुरू करणार ‘हा’ जबरदस्त स्टार्टअप

Advertisement
Advertisement

Leave a Reply