Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदूषण थांबणार..! ‘या’ दोन दिग्गज कंपन्या सुरू करणार ‘हा’ जबरदस्त स्टार्टअप

नवी दिल्ली : सध्या जगभरात प्रदूषणाच्या समस्येने हाहाकार उडाला आहे. वाढते प्रदूषण मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरत आहे. इतकेच नाही तर या प्रदूषणामुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे. जगातील अनेक देश वेगाने विकसित होत असले तरी त्या बरोबर प्रदूषणाची समस्या सुद्धा वाढत आहे. सध्या चीन, भारतासह अन्य देशात वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. वाहनांमुळे या प्रदूषणात मोठी भर पडली आहे. त्यामुळे हे घातक प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

Advertisement

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा एक मुख्य मार्ग मानला गेला आहे. त्यामुळे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे लोक आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इंधन दरवाढीचा इलेक्ट्रिक वाहनांना असा फायदा होत आहे. तसेच प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरत आहे.

Loading...
Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण होणार नाही, असे म्हटले जात असले तरी बॅटरी खराब झाल्यानंतर ते प्रदूषण देखील करेल. अशा परिस्थितीत फोर्ड (Ford) आणि व्होल्वोने (Volvo) एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. फोर्ड आणि व्होल्वो या दोन वाहन निर्माता कंपन्यांनी इलेक्ट्रिक व्हेइकल बॅटरी रिसायकल (Bttery Recycle) करण्यासाठी रेडवुड मटेरिअल नावाचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप जुन्या आणि जीर्ण झालेल्या बॅटरीचे पूर्णपणे रीसायकल करेल.

Advertisement

वास्तविक, यामध्ये बॅटरीमधून बाहेर पडणारे घटक वेगळे केले जातील आणि त्यांच्या मदतीने नवीन बॅटरी तयार करण्यास मदत होईल. हा प्रकल्प टेस्लाचे कार्यकारी जेबी स्ट्रॉबेल यांनी सुरू केला आहे. यासाठी आधी फोर्डबरोबर भागीदारी केली होती, ज्यामध्ये कंपनीने EV बॅटरीजचा पुरवठा केला होता. ज्यामध्ये रॉ मटेरियल (raw material) समाविष्ट होते, जे रिसायकल केलेल्या बॅटरीपासून बनवले होते. जगभरातील कार उत्पादक बॅटरी पुरवठ्यामध्ये येणारे घटक संतुलित करण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. LG Energy Solutions आणि GM ने मागील वर्षात LeCycle या स्टार्टअपबरोबर भागीदारीची घोषणा केली.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply