Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : Laptop आहे महत्वाचा.. ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी; अनावश्यक खर्च होणार नाही..

अहमदनगर : वाढत्या डिजिटायजेशनमुळे लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजच्या धकाधकीच्या काळात तुम्हाला सर्व कामकाज वेगाने करावे लागते. अशा परिस्थितीत, स्मार्टफो, लॅपटॉप, टॅब्लेट यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत करतात. म्हणूनच ते योग्यरित्या कार्य करत राहणे खूप महत्वाचे आहे. दुसरीकडे, जर लॅपटॉप कसा सुरक्षित ठेवायचा, काय काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरुन लॅपटॉप खराब होणार नाही, याबाबत अनेकांना माहिती नसते. तर मग, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा लॅपटॉप व्यवस्थित राहिल आणि अनावश्यक खर्चही होणार नाही.

Advertisement

आज काल ऑफिसचे काम असेल तर लॅपटॉप पाहिजेच. त्यामुळे लॅपटॉपला मागणी वाढली आहे. लॅपटॉप घेतला म्हणजे त्याची योग्य देखभाल करणेही गरजेचे आहे. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा लॅपटॉप स्वच्छ केला पाहिजे. लॅपटॉप उपकरणे व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजेत.

Loading...
Advertisement

तुमचा लॅपटॉप जर जुना झाला असेल तर त्याचा वापर कमी प्रमाणात करा. लॅपटॉप खाली एखादा चौकोनी आकाराचा लाकडाचा तुकडा ठेवा जेणेकरुन लॅपटॉपमधील सीपीयू फॅनला हवा मिळत राहिल. लॅपटॉपमधील बॅटरी सुद्धा व्यवस्थित साफ करा. अशा पद्धतीने या काही सोप्या उपायांच्या माध्यमातून तुम्ही लॅपटॉप योग्य स्थितीत ठेऊ शकाल. यामुळे लॅपटॉप व्यवस्थित राहिल वारंवार खराब होणार नाही. त्यामुळे तुमचा अनावश्यक खर्चही कमी होईल.

Advertisement

स्लो लॅपटॉपने केलेय हैराण..! मग, ‘हे’ सोपे उपाय फॉलो करा, लॅपटॉप होईल एकदम फास्ट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply