विदेशी गुंतवणुकदारांचे टेन्शन वाढले..! शेअर बाजारातून तब्बल ‘इतके’ पैसे काढले; पहा, काय आहे नेमके प्रकरण..
मुंबई : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारी महिन्यात भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 18,856 कोटी रुपये काढले आहेत. भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे FPI बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. डिपॉजिटरी डेटानुसार, 1-18 फेब्रुवारी दरम्यान, FPIs ने इक्विटीमधून 15,342 कोटी रुपये आणि कर्ज किंवा बाँड मार्केटमधून 3,629 कोटी रुपये काढले आहेत. या दरम्यान त्यांनी हायब्रीड माध्यमांमध्ये 115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे त्यांची निव्वळ काढणी 18,856 कोटी रुपये झाली आहे. देशातील बाजारातून विदेशी निधी काढून घेण्याचा हा सलग 5 वा महिना आहे.
मॉर्निंगस्टार इंडियाचे निदेशक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, की अलिकडच्या काळात भू-राजकीय तणाव आणि फेडरल रिजर्व्हद्वारे व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे FPIs भारतीय स्टॉकमधून बाहेर पडत आहेत. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर त्यांची विक्रीही तीव्र झाली आहे.
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले, की युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार रोखे आणि सोने यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळले आहेत. ते म्हणाले, की गेल्या एका वर्षात FPIs ने भारतीय समभागातून सुमारे $8 अब्ज काढून घेतले आहेत. 2009 नंतरचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
गेल्या आठवड्यात टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 85,712.56 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वात जास्त वाढले. समीक्षाधीन आठवड्यात TCS चे बाजार भांडवल 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 32,014.47 कोटी रुपयांनी वाढून 16,39,872.16 कोटी रुपये झाले. एचडीएफसीने सप्ताहात 2,703.68 कोटी रुपये जोडले आणि तिचे बाजार भांडवल 4,42,162.93 कोटींवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजारमूल्य 1,518.04 कोटी रुपयांनी वाढून 4,24,456.6 कोटी रुपये झाले.