Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

TCS ने केली कमाल.. Reliance ला बसलाय जोरदार झटका; पहा, नेमके काय घडले ?

मुंबई : देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव प्रथम येते. पण, गेल्या आठवड्यात शेअर बाजारात TCS ने रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance Industries) जोरदार झटका दिला. या काळात, टीसीएसचे बाजारमूल्य रिलायन्सपेक्षा अधिक वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजही नफा कमावण्याच्या यादीत राहिली असली तरी टीसीएस या यादीत आघाडीवर आहे. टीसीएसचे बाजारमूल्य गेल्या आठवड्यात सर्वाधिक वाढले आहे. मागील आठवड्यात टीसीएसला सर्वाधिक फटका बसला होता, तर रिलायन्‍स ही एकमेव कंपनी होती जिच्‍या बाजार मुल्‍यांकनात वाढ झाली होती.

Advertisement

10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 5 कंपन्यांनी गेल्या आठवड्यात बाजार मूल्यांकनात 85,712.56 कोटी रुपयांची भर घातली. ज्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आघाडीवर आहे. TCS चे बाजारमूल्य 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपये झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 32,014.47 कोटी रुपयांनी वाढून 16,39,872.16 कोटी रुपये झाले. एकूण बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत रिलायन्स आघाडीवर आहे.

Advertisement

हिंदुस्थान युनिलिव्हरचे (Hindustan Uniliver) मूल्यांकन 12,781.78 कोटी रुपयांनी वाढून 5,43,225.5 कोटी रुपयांवर पोहोचले. या व्यतिरिक्त, HDFC ने 2,703.68 कोटी जोडले, त्याचे मूल्यांकन रु. 4,42,162.93 कोटी झाले. बजाज फायनान्सचे (Bajaj Finance) मूल्यांकन 1,518.04 कोटी रुपयांनी वाढून 4,24,456.6 कोटी रुपये झाले.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, HDFC बँकेचे बाजार भांडवल (mcap) 3,399.6 कोटी रुपयांनी घसरून 8,38,529.6 कोटी रुपये आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल 5,845.84 कोटी रुपयांनी घसरून 7,17,944.43 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे मूल्यांकन 28,779.7 कोटी रुपयांनी घसरून 5,20,654.76 कोटी रुपये झाले. त्याच वेळी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) मूल्यांकन 12,360.59 कोटी रुपयांनी घसरून 4,60,019.1 कोटी रुपये झाले. याशिवाय, भारती एअरटेलचे (Bharati Airtel) मूल्यांकन 961.11 कोटी रुपयांनी घसरून 3,91,416.78 कोटी रुपयांवर आले.

Advertisement

टाटा-रिलायन्सला अदानी देणार जोरदार टक्कर; नव्या बिजनेस जगतात करणार पदार्पण..

Advertisement

टॉप-10 कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्यापाठोपाठ TCS, HDFC बँक, HUL, ICICI बँक, SBI, HDFC, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply