Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. फक्त तीनच महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांनी केलाय ‘हा’ चमत्कार.. पहा, कशामुळे आलेत अच्छे दिन..?

मुंबई : देशात आता पारंपरिक वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळेच केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारे आता या दिशेने पायाभूत सुविधा तयार करत आहेत. अलीकडेच अर्थसंकल्पातही इलेक्ट्रिक वाहनांबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. काही काळापासून, देशातील पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने देखील महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणूनच लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दर महिन्याला पाहिले तर या वाहनांच्या खरेदीतही वाढ होताना दिसत आहे.

Advertisement

पर्यावरण, ऊर्जा आणि पाणी परिषदेच्या माहिती पत्रकावरुन असे लक्षात येते, की इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तेजीत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीत, विक्रीत 250 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ईव्हीची विक्री 1.3 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तर आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत केवळ 34 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती.

Advertisement

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करण्यामागे काही कारणे आहेत. एकतर देशात इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यात इलेक्ट्रिक वाहनांवर केंद्र आणि राज्य सरकार अनुदान देत आहे. तसेच कंपन्या अनेक दमदार इलेक्ट्रिक वाहने वेगाने मार्केटमध्ये आणत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होत आहे.

Loading...
Advertisement

CEEW-CEF माहिती पत्रकात हे देखील अधोरेखित केले आहे, की गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत एकूण वीज निर्मिती 3.7 टक्क्यांनी वाढून 324 अब्ज किलोवॅट-तास (kWh) झाली आहे. सणासुदीच्या काळात आर्थिक घडामोडी वाढल्याने हा प्रकार घडला. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत लिलाव केलेल्या एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत 61 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीतील वीज वितरण कंपन्यांची एकूण थकबाकी देखील मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत सात टक्क्यांनी (7%) वाढून 1.23 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांचे ‘टेन्शन’ होतेय कमी.. देशातील 9 शहरांत सरकारने केलीय मोठी कामगिरी; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply