Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फक्त 580 रुपयांत तब्बल 1000 हजार किलोमीटर.. पहा, ‘ही’ आहे टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक कार..

मुंबई : सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचे टेन्शन वाढले आहे. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमी आहे. तथापि, इलेक्ट्रिक वाहने जास्त खर्चिक आहेत. पण इंधन वाहनांच्या तुलनेत ही वाहने जास्त फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला 520 रुपयांमध्ये 1000 किलोमीटरचा प्रवास करू शकते.

Advertisement

आम्ही Tata Nexon EV बद्दल माहिती देत आहोत. या कारची किंमत 14,24,000 रुपयांपासून सुरू होते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. कार पर्मनंट मॅग्नेट एसी मोटरद्वारे चालविली जाते, जी 245 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. कार IP67 प्रमाणित 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे.

Advertisement

Tata Nexon EV एका चार्जवर किमान 300 किमी चालू शकते. Nexon ची बॅटरी 15 amp प्लगने घरी देखील चार्ज केली जाऊ शकते. कंपनीने 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी दिली आहे. एका तासापेक्षा कमी कालावधीत ही कार 80 टक्के चार्ज होईल. दुसरीकडे, स्टँडर्ड चार्जरवर चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तास लागतील. याशिवाय Tata Nexon EV मध्ये सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Loading...
Advertisement

या कारमध्ये 30.2 kwh ची बॅटरी आहे. अशा परिस्थितीत ती पूर्ण चार्ज करण्यासाठी 30.2 युनिट वीज लागते म्हणजेच 6 रुपये/युनिट वीज दर विचारात घेतल्यास, एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी 181.2 रुपये खर्च येतो आणि नंतर 312 किलोमीटरपर्यंत चालते. अशा प्रकारे, त्याची प्रति किलोमीटर किंमत 58 पैशांच्या जवळपास येते. त्यामुळे कार 1000 किमी चालवण्यासाठी 580 रुपये वीज खर्च होईल असे म्हणता येईल.

Advertisement

काम की बात : ‘अशा’ पद्धतीने घ्या आपल्या इलेक्ट्रिक कारची काळजी; कार देईल जबरदस्त रेंज

Advertisement
Advertisement

Leave a Reply