Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल ‘हा’ व्यवसाय; सरकारही करेल मदत; उत्पन्नही मिळेल चांगले..

अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात अनेकांनी स्वतःचा काहीतरी बिजनेस सुरू करण्याचा विचार केला, अनेकांनी तर हा विचार प्रत्यक्षात आणून बिजनेस सुरू देखील केला. आजही अनेक जण नवीन बिजनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत. असे बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण अगदी घरुन सुद्धा करू शकतो. तसेच नोकरदार मंडळींना त्यांचा रोजगार सांभाळूनही व्यवसाय करता येणे शक्य होते. साबण तयार करण्याचा व्यवसाय हा असाच एक व्यवसाय आहे, जो तुम्ही अगदी सहज सुरू करू शकता. विशेष म्हणजे, सरकारही यासाठी तुम्हाला मदत करेल. या बिजनेसच्या माध्यमातून तुम्ही चांगले उत्पन्नही मिळवू शकता.

Advertisement

या बिजनेससाठी तुम्हाला जास्त पैशांची गुंतवणूकही करावी लागणार नाही. तसेच सरकारही तुम्हाला मदत करेल. या बिजनेसमध्ये यंत्राच्या मदतीने साबण तयार केले जातात. साबण तयार केल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये न्यावा लागेल. काही जण हातानेही साबण तयार करुन विकतात. हा बिजनेस तुम्ही मर्यादीत स्वरुपातही सुरू करू शकता. तसे पाहिले तर साबणाला कायम मागणी असते. त्यामुले या बिजनेसमध्ये यश मिळण्याचीही शक्यता जास्त आहे. आपल्या देशात साबणाचे अनेक प्रकार आहेत. मागणी आणि मार्केट लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या प्रकारचा साबण तयार करायचा हे ठरवू शकता.

Advertisement

साबण तयार करण्याचे युनिट उभारण्यासाठी तुम्हाला किमान 750 चौरस फुट जागेची गरज असेल. त्यासाठी 500 स्क्वेअर फूट आच्छादित आणि 250 स्क्वेअर फूट मोकळी जागा असेल. यामध्ये सर्व प्रकारच्या यंत्रांसह 8 प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता असेल. प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, या मशीन बसवण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येईल. तसेच साबण तयार करण्याचे एक प्रॉडक्शन युनिट उभारण्यासाठी किमान 15 लाख 30 हजार रुपये खर्च येईल. तरी हा बिजनेस सोपा आहे. कारण, यामध्ये युनिटची जागा, यंत्रसामग्री आणि तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

या 15.30 लाखांपैकी तुम्हाला साधारण 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. बाकीचे पैसे तुम्ही मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवू शकता. केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार, तुम्ही एक वर्षात सुमारे 4 लाख किलो उत्पादन होऊ शकेल. त्याची एकूण किंमत 47 लाख रुपये राहिल. साबण तुम्ही अगदी लहान गाव ते मोठ्या शहरापर्यंत कुठेही विक्री करू शकता. मार्केटबाबत चांगला अभ्यास असेल तर तुमचे काम आधिकच सोपे होईल. या बिजनेससाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून तुम्ही किमान 80 टक्के कर्ज मिळवू शकता. त्यामुळे जास्त पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही.

Advertisement

Business Ideas : कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय.. महिन्याला मिळावा दीड लाखाहून अधिक रुपये

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply