Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दुचाकी खरेदीचा आहे प्लान ? जरा थांबा.. येतेय आणखी एक शानदार मोटारसायकल; पहा, काय आहेत फिचर

मुंबई : देशात दुचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. अनेक कंपन्या नवीन दुचाकी लाँच करत आहेत. आता देश-विदेशात प्रसिद्ध असलेली कंपनी Royal Enfield लवकरच एक शानदार मोटारसायकल आणणार आहे. कंपनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपली आगामी Scram 411 मोटरसायकल लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अद्याप तारीक निश्चित केलेली नाही. मात्र, 11 ते 15 मार्च दरम्यान मोटारसायकल लाँच होऊ शकते, अशी माहिती आहे.

Advertisement

या नव्या मोटारसायकलकडून कंपनीस बरेच काही अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, मोटारसायकल लाँच होण्याआधीच कंपनीने पुरवठादारांना वाहने पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मोटारसायकल दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये आहे. त्यानंतर ही दुचाकी आणखी अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल, ज्याचा तपशील येत्या काही दिवसांत समोर येईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Advertisement

अलीकडेच, मोटरसायकलचे अधिकृत माहितीपत्रकही मिळाले होते. यामुळे त्याच्या काही नवीन वैशिष्ट्यांचा तपशील समोर आला आहे. Royal Enfield Scram 411 ला 411cc, सिंगल-सिलिंडर युनिट मिळेल. हे इंजिन 24.3 bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. ट्रान्समिशन रॉयल एनफिल्ड हिमालयन दुचाकीमध्ये दिलेल्या प्रमाणेच राहील. Scram 411 ही हिमालयाची आवृत्ती असेल. हिमालयावरील 21-इंच फ्रंट व्हीलच्या विपरीत, Scram 411 ला एक लहान 19 इंच फ्रंट व्हील मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading...
Advertisement

तथापि, मागील चाक तेच 17 इंच राहील. हार्डकोर ADV ट्रिमच्या तुलनेत ते वेगळे दिसण्यासाठी बाह्य लुकमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच या दुचाकीत कंपनीने आणखीही काही वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यामुळे ही दुचाकी अन्य दुचाकींच्या तुलनेत वेगळी ठरते. तसेही कंपनीच्या दुचाकींनी देशासह विदेशातही चांगली मागणी आहे. त्यामुळे कंपनी विचार करुन नवीन दुचाकी लाँच करत असते. आता, कंपनीच्या या नव्या दुचाकीस कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

बाब्बो.. होंडाने ‘या’ दुचाकीची किंमत 1 लाखाने केलीय कमी; पहा, असे नेमके काय घडले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply