Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : एकापेक्षा जास्त सेविंग्ज अकाउंट आहेत का..? ; मग, जाणून घ्या, काय आहेत फायदे आणि नुकसान..?

अहमदनगर : आजच्या काळात बँकेत खाते असल्याशिवाय काही कामकाज होणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाचे बँकेत खाते असतेच. आता देशातील बहुतांश लोकांनी कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते (Saving Account) उघडले आहे. इतकेच नाही तर बहुतांश लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत. जर तुम्ही खाजगी क्षेत्रातील पगारदार कर्मचारी असाल आणि तुम्ही अनेक ठिकाणी जॉब केला असेल तर तुमचे अनेक बँकांमध्ये खाते असतीलच. तर आता प्रश्न असा आहे, की जास्त बँक खाते असतील तर काय फायदे होतात आणि किती नुकसान होते. त्यामुळे याबाबत आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचा मोठे नुकसान हे आहे, की आपण त्यांची देखभाल करू शकत नाही. बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. जेव्हा आपण खात्यात किमान शिल्लक ठेवत नाही किंवा त्या खात्यात कोणताही व्यवहार करत नाही, तेव्हा ते निष्क्रिय होते. हे बहुतेक पगारदार लोकांच्या बाबतीत घडते. जेव्हा जेव्हा ते नवीन कंपनीमध्ये रुजू होतात तेव्हा तेथे नवीन बँक खाते उघडले जाते आणि जुन्या खात्याचा व्यवहार न केल्यामुळे ते खाते निष्क्रिय होते.

Advertisement

तुम्ही खाते सांभाळू शकत नसाल तर बँक त्यावर काही शुल्कही आकारते. तसेच आपण हे शुल्क वेळच्या वेळी भरले नाही तर वाढत जाते. त्यामुळे संबंधित खातेदाराचा CIBIL स्कोअर खराब होतो. अनेक सेवा शुल्क बँक खात्याबरोबर येतात. जसे की एसएमएस अलर्ट चार्ज (SMS Alert Charges), डेबिट कार्ड चार्ज (Debit Card Charge) इत्यादी. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असल्यास तुम्हाला प्रत्येक खात्यावर हे शुल्क भरावे लागेल.

Loading...
Advertisement

अनेक खाजगी बँका खात्यात काही किमान शिल्लक ठेवण्यास सांगतात. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असल्यास, तुमचे पैसे या खात्यात अडकून पडतील. याचा तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होईल. एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये पैसे ठेवल्यास व्याजाचे नुकसान होऊ शकते. अनेक बँका खात्यातील जास्त रकमेवर जास्त व्याजदर देतात. जर तुम्ही तुमचे सर्व पैसे अशा बँकेच्या खात्यात ठेवले तर तुम्हाला भरपूर व्याज मिळेल.

Advertisement

आयटीआर (Income Tax Return) तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांचा तपशील द्यावा लागेल. जर तुमच्याकडे अनेक बँक बचत खाती असतील, तर त्यांची बँक स्टेटमेंट गोळा करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्हाला घर, कार, विवाह आणि शिक्षण इत्यादींसाठी बचत करायची असेल, जी सुरक्षित आहे, तर एक मार्ग म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या बचत खात्यांमध्ये या उद्दिष्टांसाठी पैसे गोळा करू शकता. बचत खात्याचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यातून कधीही पैसे काढू शकता. ते तुमची तरलता राखते. तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममधून कधीही पैसे काढू शकता. अधिक बचत खाती ठेवण्याचा हा फायदा आहे.

Advertisement

काम की बात : DRDO आणि ISRO मध्ये काय आहे फरक… जाणून घ्या इतिहास आणि महत्व

Advertisement
Advertisement

Leave a Reply