Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Effect : भारतीयांबाबत आलाय नवा अहवाल; पहा, कोरोनावर मात करण्यासाठी काय आहे भारतीयांचा प्लान..?

दिल्ली : सध्या अवघे जग कोरोना नावाच्या घातक आजाराच्या विळख्यात सापडले आहे. दोन वर्षे उलटली तरी हा आजार मिटलेला नाही. नव्या व्हेरिएंटमुळे काही देशात परिस्थिती जास्त खराब झाली आहे. आधीच्या व्हेरिएंटने सुद्धा प्रचंड त्रास दिला. अनेकांचे मृत्यू झाले. तसेच या आजाराने मानवी आरोग्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. तसेच मानवी आरोग्यावरही या संकटाचा विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

मार्गदर्शक कंपनी EY इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, भारतीय नागरिक आता आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित गोष्टींवर आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यास तयार आहेत. सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, कोविड-19 साथीच्या आजारामुळे झालेल्या बदलांमुळे भारतीय आता नैसर्गिक अन्न, पूरक अन्न आणि विशेष खाद्यपदार्थांवर भर देत आहेत. कोरोना व्हायरसच्या साथीबरोबरच लोकांमध्ये आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीबाबत जागरूकता वाढली आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की जागतिक स्तरावर 82 टक्के लोक त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत जास्त सतर्क झाले आहेत, तर भारतात हे प्रमाण 94 टक्के आहे.

Advertisement

या सर्वेक्षणातील 52 टक्के सहभागी लोकांना असे वाटते, की कोरोनानंतरही मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातील बदल कायम राहील. तर जागतिक स्तरावर ही संख्या 39 टक्के आहे. संस्थेचे अंगशुमन भट्टाचार्य म्हणाले, की काही लोक याला अल्पकालीन उपाययोजना म्हणून पाहतात, परंतु यामुळे वैयक्तिक आरोग्य, स्वच्छता, निरोगीपणा आणि सर्वांगीण पोषण यांना प्रोत्साहन मिळेल असे अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

सर्वेक्षण डेटा EY फ्यूचर कंझ्युमर इंडेक्स (नोव्हेंबर 2021) वर आधारित आहे, ज्यामध्ये जागतिक पातळीवर एकूण 16,000 लोकांनी भाग घेतला, त्यापैकी 1002 लोक भारतीय होते. अहवालात असे म्हटले आहे, की नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये वाढत्या स्वारस्याने या विभागात आधीच असलेल्या कंपन्यांना आणखी बळकट करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

Advertisement

‘त्यामुळे’ अमेरिकेतील मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात; पहा, कोरोनाचा आरोग्यावर कसा पडलाय इफेक्ट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply