Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात ‘या’ शहरात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल.. पहा, 106 दिवसांनंतर देशात काय आहेत इंधनाचे भाव..?

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी (19 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मात्र प्रचंड वाढले आहेत. देशांतर्गत पातळीवर सलग 106 दिवसांनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये (Delhi Petrol Price) आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये (Delhi Diesel Price) आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.14 रुपये दराने विक्री होत आहे.

Advertisement

नवीन दरानुसार, आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. त्याच वेळी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे द्यावे लागत आहेत. येथे पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त आहे 95.41 रुपये आहे. त्याचवेळी भोपाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे.

Advertisement

देशातील अन्य काही शहरात राजस्थान राज्यातील श्री गंगानगर मध्ये पेट्रोल 112.11 रुपये तर डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. मुंबई पेट्रोल 109.98 आणि डिझेल 94.14 रुपये, भोपाळ पेट्रोल 107.23 आणि डिझेल 90.87 रुपये, जयपूर पेट्रोल 107.06 रुपये आणि डिझेल 90.70 रुपये, पाटणा पेट्रोल 105.90 रुपये आणि डिझेल 91.09 रुपये, कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये, तर डिझेल 89.79 रुपये, चेन्नई पेट्रोल 101.40 आणि डिझेल 91.43 रुपये, बंगळुरू पेट्रोल 100.58 आणि डिझेल 85.01 रुपये, रांची पेट्रोल 98.52 तर डिझेल 91.56 रुपये,

Loading...
Advertisement

नोएडा पेट्रोल 95.51 रुपये तर डिझेल 87.01 रुपये, दिल्ली पेट्रोल 95.41 तर डिझेल 86.67 रुपये, आग्रा पेट्रोल 95.05 तर डिझेल 86.56 रुपये, लखनऊ पेट्रोल 95.28 तर डिझेल 86.80 रुपये, चंदीगड पेट्रोल 94.23 तर डिझेल 80.90 रुपये तसेच पोर्ट ब्लेअरमध्ये एक लीटर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे.

Advertisement

भारीच की.. आता पेट्रोल-डिझेलला मिळणार सुट्टी; सरकारने तयार केलाय ‘हा’ भन्नाट प्लान.,

Advertisement
Advertisement

Leave a Reply