‘त्या’ संकटाचा सोन्यावर होतोय ‘असा’ ही इफेक्ट.. पहा, सोन्याचे भाव वाढणार की घटणार..?
मुंबई : सोन्याचा भाव सध्या 50 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वर आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात 1898 प्रति औंसवर बंद होण्याआधी सोन्याचा भाव $1900 वर गेला होता. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरी हे सोन्याचे भाव वाढण्याचे कारण मानले जात आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 50,123 प्रति 10 ग्रॅम वर गेला होता.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्याच्या किमतीने $ 1900 ते $ 1910 प्रति औंस या टप्प्यात आहे आणि आता नफा बुक केल्यामुळे त्यात काही सुधारणा दिसू शकतात. युक्रेन आणि रशियामधील तणाव कमी झाला असला तरी जागतिक चलनवाढीचे टेन्शन अजूनही कायम आहे, असेही ते म्हणतात. त्यामुळे सोन्याचे भाव अजूनही वाढत राहणार आहेत.
कमोडिटी तज्ज्ञांचे असे मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $1865 च्या आसपास येऊ शकते आणि या पातळीच्या आसपास 3-4 महिन्यांचा कालावधी लक्षात घेता $2000 प्रति औंस या लक्ष्यासाठी नवीन खरेदी केली पाहिजे. देशांतर्गत बाजारावर सांगताना, कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की 3-4 महिन्यांच्या कालावधीत मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 52 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आयआयएफएल सिक्युरिटीचे अनुज गुप्ता म्हणतात, की 51,000 रुपयांचे तात्काळ लक्ष्य ठेवून सोने खरेदी केले जाऊ शकते. 3-4 महिने असेच चालू राहिल्यास 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी पाहायला मिळेल.
जगभरातील वाढती महागाई आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दर नेहमीच कमी जास्त होत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणावही यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 50 हजार 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच, सोन्याने पुन्हा एकदा 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज मात्र सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले.
सोन्याच्या भाववाढीमागे काही महत्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे महागाई. जगभरात महागाई (inflation) वाढली आहे. अमेरिका, ब्रिटेनसारख्या श्रीमंत देशांनाही महागाईचे चटके बसत आहेत. दुसरीकडे भारतातही किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर अमेरिकेत किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक पातळीवर आहे. त्यानंतर रशिया-युक्रेन तणावाचा (Ukraine Russia Conflict) परिणाम दिसून येत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे, की रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करू शकतो. अमेरिकेने तसा इशाराही दिला आहे. हे संकट पाहता जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत.
खुशखबर.. आज सोन्या-चांदीचे भाव पुन्हा घटले; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर..