Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. आता आलाय महिनाभराचा प्लान.. जिओच्या ‘या’ प्लानमध्ये मिळतात इतके जबरदस्त फायदे..

मुंबई : देशातील टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढीनंतर अनेक बदल केले आहेत. आता जिओने असा प्लान आणला आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही मर्यादेशिवाय इंटरनेट वापरू शकता. त्यामुळे आता दररोजच्या डेटा लिमिटचे टेन्शन या प्लानमध्ये राहणार नाही. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज वापरल्या जाणार्‍या डेटाची मर्यादा नाही. तसेच, जिओचा हा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना एक महिन्याची म्हणजेच पूर्ण 30 दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे, तर चला जाणून घेऊ या जिओच्या या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे आहेत.

Advertisement

जिओच्या 296 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
रिलायन्स जिओचा हा प्लॅन जिओच्या फ्रीडम प्लॅन्स (freedpm plan) श्रेणी अंतर्गत येतो. Jio च्या या प्लान मध्ये 25GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे, या प्लानमध्ये तुम्ही दररोज कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज किती डेटा खर्च केला जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. जिओचा हा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही.

Advertisement

जिओच्या 296 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये Jio अॅप (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, काही दिवसांआधी ट्रायने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले होते, की त्यांनी त्यांचे रिचार्ज प्लान 30 दिवसांच्या मुदतीचे करावेत. एखादा तरी असा प्लान कंपनीकडे पाहिजे की जो 30 दिवसांच्या वैधतेसह येईल. त्यानुसार, कंपनीने प्लान सुधारीत केला आहे. आता या प्लानमध्ये 24 किंवा 28 दिवस नाही तर 30 दिवस म्हणजेच महिनाभराची वैधता मिळणार आहे. या निर्णयामुळे कंपन्यांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे मात्र, नागरिकांचा फायदा होणार आहे.

Advertisement

‘Jio’-‘Airtel’ कडे आहेत ‘BSNL’ ला झटका देणारे प्लान; पहा, तुम्हाला किती मिळतील फायदे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply