Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अजब-गजब : या कारमध्ये आहे जबरदस्त फिचर.. फक्त एकाच क्लिकने पहा काय होईल कमाल..

नवी दिल्ली : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने (Tesla) जगभरात जबरदस्त क्रेझ निर्माण केली आहे. जगात टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक कारना चांगली मागणी आहे. या कंपनीला अद्याप भारतात एन्ट्री मिळालेली नाही. कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरकारने काही अटी टाकल्या आहेत. या अटी पूर्ण केल्याशिवाय टेस्ला कंपनीस एन्ट्री मिळणार नाही. असे असले तरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात कदाचित टेस्ला कंपनीच्या कार आपल्याकडेही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

कंपनी सध्या आपल्या इलेक्ट्रिक कार्स चांगल्या बनवण्यासाठी सतत नवनवीन फिचर्स देत असते आणि यावेळी कारसोबत जोडलेले फिचर एकदम दमदार आहे. आपण कदाचित विचार केला नसेल मात्र कंपनीने हे शक्य करुन दाखवले आहे. हे फिचर नेमके काय आहे, कसे काम करते याबाबत आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

टेस्ला कारमध्ये मिळालेल्या कार कलराइजरद्वारे इन्फोटेनमेंट स्क्रीनवर आपणास पाहिजे तो रंग निवड करू शकतो. यानंतर, ज्यावेळी वाहनचालक उर्वरित वैशिष्ट्ये किंवा नेव्हिगेशन वापरतो तेव्हा त्याला ही सर्व माहिती निवडलेल्या रंगात मिळते. कलर व्हीलच्या साहाय्याने काही क्षणात हा रंग अनेक रंगांमध्ये बदलता येतो. इन्फोटेनमेंट स्क्रीनचा बदललेला रंग तुम्हाला पाहिजे तितका काळ सेव्ह केला जाऊ शकतो. टेस्ला अॅप मदतीने देखील तुम्ही हे फिचर वापरू शकता.

Loading...
Advertisement

कार रंग बदलत नाही तर हे फिचर तुम्हाला फक्त कार केबिनमधील टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कारच्या बाहेरील रंग बदलू शकत नाही. BMW ने मात्र अशी कार बाजारात आणली आहे जी आपला रंग बदलते. कंपनीची IX M60 Flow ही इलेक्ट्रिक कार आहे जी रंग बदलते. या कारच्या बाहेरील भागावर ई-इंक आवरण केले गेले आहे जे लाखो मायक्रो कॅप्सूलद्वारे त्याचा रंग बदलते. या कारचे हे मायक्रोकॅप्सूल बटन दाबल्यावर त्यांचा रंग बदलते.

Advertisement

सरकारने टेस्लाला फटकारले..! कंपनीचा ‘तो’ प्लान यशस्वी होऊ देणारच नाही; पहा, काय आहे कंपनीचा प्लान ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply