Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ चीनी कंपनीने आणलाय आपल्या बजेटमधील स्मार्टफोन.. पहा, काय आहे फिचर आणि किंमत..?

मुंबई : जगात स्मार्टफोन मार्केटमध्ये चीनी कंपन्यांचा दबदबा आहे. अन्य कोणत्याही मोबाइल कंपनीच्या तुलनेत चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन जास्त प्रमाणात विक्री होतात. त्यामुळे तर जगातील अनेक देशातील स्मार्टफोन मार्केट चीनने काबीज केले आहे. भारतातही चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या संख्येने विक्री होतात. आताही देशात आघाडीवर असणाऱ्या वीवो या कंपनीने जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, हे स्मार्टफोन बजेटमधील आहेत.

Advertisement

Vivo ने Y सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y15s देशातील मार्केटमध्ये लाँच केला आहे. Vivo Y15s मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या फोनमध्ये 13 मेगापिक्सल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन दोन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. Vivo Y15s गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आला होता.
Vivo Y15s ची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Android 11 Go Edition वर आधारित Funtouch OS 11.1 Vivo Y15s मध्ये देण्यात आला आहे. यात 720×1600 पिक्सेल रिजोल्यूशनसह 6.51 इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. फोनबरोबर 1 GB पर्यंत विस्तारित रॅम उपलब्ध आहे.

Loading...
Advertisement

Vivo Y15s मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल आहे. समोर 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या Vivo फोनमध्ये 4G, Micro USB, Bluetooth v5.0 आणि Wi-Fi सारखी वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये 10W चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे.

Advertisement

भारत चीनला त्या पद्धतीने देणार मात..! ‘मेक इन इंडिया’ बाबत सरकारने घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply