Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

SBI Report : भारताचा GDP कसा राहणार..? ; पहा, काय अंदाज व्यक्त केलाय नव्या अहवालात; वाचा महत्वाची माहिती..

मुंबई : ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाची जीडीपी (Gross Domestic Product) वाढ 5.8 टक्के असू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) संशोधन अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली आहे. तथापि, जुलै-सप्टेंबरमधील जीडीपी वाढीचा दर मागील तिमाहीतील 20.1 टक्के वाढीपेक्षा कमी होता.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) 28 फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी GDP अंदाज जाहीर करेल. SBI ने शुक्रवारी जारी केलेल्या या संशोधन अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 5.8 टक्के असेल. यामध्ये संपूर्ण वर्षाचा (आर्थिक वर्ष 2021-22) जीडीपी वाढीचा अंदाज 9.3 टक्क्यांवरून 8.8 टक्के करण्यात आला आहे. औद्योगिक घडामोडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित 41 वारंवारता निर्देशकांवर आधारित आहे. याबरोबरच अहवालात म्हटले आहे, की सरकार ग्रामीण भागातील गरिबांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्जही देऊ शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयएमएफने भारताचा विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. IMF ने काही दिवसांपूर्वी म्हटले होते, की जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2021 मध्ये 5.9 टक्क्यांवरून 2022 मध्ये 4.4 टक्क्यांपर्यंत घसरेल. आयएमएफचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) 9.2 टक्के आणि रिजर्व्ह बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील 9.5 टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. याशिवाय हा अंदाज S&P च्या 9.5 टक्के आणि मूडीजच्या 9.3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Advertisement

याआधी संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते, की आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल. मात्र, भारताचा आर्थिक विकास अचानक थांबण्याचा इशाराही दिला होता. कोळशाची टंचाई आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात भारताच्या आर्थिक घडामोडींमध्ये अडचणी येऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सांगण्यात आले होते. पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाई देशांचा दबदबा राहणार असून अमेरिका, ब्रिटेन सारख्या विकसित देशांनाही हे देश मागे टाकतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply