Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भविष्यात टेलिकॉम कंपन्या कमावणार कोट्यावधी रुपये; पण, कसे..? ; पहा, काय म्हटलेय त्या अहवालात..?

मुंबई : जगभरातील डिजिटल इकोसिस्टम वेगाने बदलत आहे. एका अहवालात असे समोर आले आहे, की 10 वर्षांनंतर म्हणजेच 2032 पर्यंत जगभरात इंटरनेट डेटाचा वापर 20 पटीने वाढेल. म्हणजे आज जर तुम्ही दररोज 2 GB डेटा वापरत असाल तर 10 वर्षांनंतर तुम्ही 40 GB डेटा वापरण्यास सुरुवात कराल. याचा फायदा एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांना होईल, असे अपेक्षित आहे. थोडक्यात Airtel आणि Jio प्रचंड नफा कमावतील. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या क्रेडिट सुइसच्या (Credit Suisse) अहवालातून ही बाब समोर आली आहे.

Advertisement

मेटाव्हर्स इकोसिस्टम जसजसा विकसित होईल तसतसा तुमचा स्क्रीन वेळ वाढेल असे अहवालात नमूद केले आहे. म्हणजे मोबाइल, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर तुमचा जास्त वेळ जाईल. याबरोबरच बँडविड्थचा वापरही वाढण्याची शक्यता आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानात मोठी भर पडू शकते. कारण ते मेटाव्हर्सच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालानुसार, जेथे 5G मुळे मेटाव्हर्स इकोसिस्टमचा विस्तार होईल. त्याच वेळी, 6G च्या आगमनाने, मेटाव्हर्स वापराच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल.

Loading...
Advertisement

सुरुवातीच्या काळात Metaverse चा सर्वात मोठा प्रभाव गेम उद्योगात दिसून येतो. अहवालानुसार, गेमिंग सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ज्यात वेगाने वाढ होण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, दररोज मोबाइलवर जास्त वेळ देणाऱ्या देशांमध्ये आपल्या देशाचा समावेश होतो. त्यात आता मेटाव्हर्सच्या एंट्रीनंतर, स्क्रीनचा टाइम आधीपेक्षा जास्त असेल. यामुळे Airtel आणि Jio सारख्या दूरसंचार कंपन्यांचा महसूल वाढेल. देशातील ब्रॉडबँड प्रवेश चालू आर्थिक वर्षात 9 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची योजना आहे, ती 2020 मध्ये 6.8 टक्के होती.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाच्या संकटातही आयटी कंपन्यांनी केलीय बक्कळ कमाई; पहा, किती पैसे कमावलेत..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply