Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर.. आज सोन्या-चांदीचे भाव पुन्हा घटले; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर..

मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण झाली. मात्र, त्यानंतरही सोन्याचा भाव 50 हजारांच्या वर राहिला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घट नोंदवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत.

Advertisement

आजचे सोन्याचे दर बघितले तर हे सोने 50 हजारांच्या पुढे व्यवहार करत आहे. परंतु असे असूनही, ते अजूनही त्याच्या विक्रमी पातळीपेक्षा खूप कमी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 वर पोहोचली होती. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव (gold price) आज 0.36 टक्क्यांनी घसरून 50,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, आजच्या व्यवहारात 0.03 टक्के कमी होऊन चांदी 63,840 रुपये प्रति किलो (silver price) वर व्यवहार करत आहे.

Advertisement

जगभरातील वाढती महागाई आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दर नेहमीच कमी जास्त होत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणावही यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 50 हजार 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच, सोन्याने पुन्हा एकदा 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज मात्र सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले.

Loading...
Advertisement

सोन्याच्या भाववाढीमागे काही महत्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे महागाई. जगभरात महागाई (inflation) वाढली आहे. अमेरिका, ब्रिटेनसारख्या श्रीमंत देशांनाही महागाईचे चटके बसत आहेत. दुसरीकडे भारतातही किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर अमेरिकेत किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक पातळीवर आहे. त्यानंतर रशिया-युक्रेन तणावाचा (Ukraine Russia Conflict) परिणाम दिसून येत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे, की रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करू शकतो. अमेरिकेने तसा इशाराही दिला आहे. हे संकट पाहता जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत.

Advertisement

आजही सोन्याला बसलाय झटका..! पहा, किती रुपयांनी घटलेत भाव; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply