Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार ‘त्या’ व्यापारी, दुकानदारांनाही देणार पेन्शन.. ‘अशा’ पद्धतीने करता येईल नोंदणी.. जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : केंद्रातील मोदी सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. आता सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित राहील.

Advertisement

या पेन्शन योजनेंतर्गत, किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदारांची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

पेन्शन योजनेत सामील होणारे लोक देशभरात पसरलेल्या 3.25 लाख सामान्य सेवा केंद्रांवर (common service center) नोंदणी करू शकतात. तसेच या योजनेबाबत आधिक माहिती याबाबत http://maandhan.in या वेबसाइटवरुनही मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपा नियम करण्यात आला आहे. यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक असेल. NPS (National Pension Scheme) नाव नोंदणीसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड (aadhar card) आणि बचत बँक खाते (saving account), जन धन खाते (jan dhan account) क्रमांक असणे आवश्यक आहे.

Loading...
Advertisement

NPS व्यापार्‍यांसाठी अर्ज करण्‍यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम, योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यापाऱ्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. यासोबतच, जर तो आयकरदाता असेल तर तो या योजनेत सामील होण्यास पात्र नाही. केवळ तोच व्यापारी या योजनेत सामील होऊ शकतो, जो आयकरदाता नाही. या योजनेत तुम्हाला 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल.

Advertisement

‘त्या’ व्यापाऱ्यांसाठी बजेट देणार खुशखबर; जाणून घ्या, काय आहे केंद्र सरकारचा विचार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply