Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Digital Economy : विदेशातही डिजिटल इंडियाचा दबदबा.. आता ‘हा’ देश सुरू करणार UPI

दिल्ली : डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशात सुरू झालेल्या UPI प्रणालीला आता परदेशातही मागणी आहे. देशाची UPI प्रणाली स्वीकारणारा नेपाळ पहिला देश ठरला आहे. यामुळे शेजारील देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी गेटवे पेमेंट्स सर्व्हिस (GPS) आणि मनम इन्फोटेक यांच्याबरोबर करार केला आहे.

Advertisement

GPS नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे. मनम इन्फोटेक नेपाळमध्ये युपीआय (Unified Payments Interface) लागू करेल. NPCI ने एका निवेदनात म्हटले आहे की, यामुळे नेपाळमधील लोकांची अडचणी कमी होतील आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल.

Advertisement

नेपाळ हा पहिला देश असेल ज्याने रोख व्यवहारांच्या डिजिटायजेशनला प्रोत्साहन देणारे UPI पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून स्वीकारले आहे. GPS चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश प्रसाद मनंधर म्हणाले, की UPI सेवेचा देशातील डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. नेपाळमधील डिजिटल अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्‍यात आणि रोखीचे व्यवहार करण्यात या उपक्रमाचा फायदा होईल.

Loading...
Advertisement

एनआयपीएलचे सीईओ रितेश शुक्ला म्हणाले की, UPI ने 2021 मध्ये $940 अब्ज किमतीचे 3,900 कोटी आर्थिक व्यवहार सक्षम केले, जे भारताच्या GDP च्या सुमारे 31 टक्के इतके आहे. NPCI सध्या युपीआय लाईट (UPI Light) वर काम करत आहे. UPI Light च्या मदतीने तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पेमेंट करू शकता. याचा फायदा देशातील ग्रामीण भागातील कोट्यावधी लोकांना होणार आहे, जिथे इंटरनेट व्यवस्थित मिळत नाही. याद्वारे, कोणतीही व्यक्ती फिचर फोनवरून डिजिटल पेमेंट करू शकेल.

Advertisement

वाव.. डिजिटल पेमेंटमध्ये मिळालीय आघाडी; पहा, चीन आणि अमेरिका कुठे आहेत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply