Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महागाईचे चटके कायम..! साबण, पावडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पहा, कोणत्या कंपनीने दिलाय ‘हा’ झटका

दिल्ली : दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लोकांच्या अडचणीत वाढ करत आहे. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाने झटका दिल्यानंतर आता साबण (soap), डिटर्जंट पावडर यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. खरं तर, देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने फेब्रुवारीमध्ये या उत्पादनांच्या किमती 3 ते 10 टक्क्यांनी वाढ केल्या आहेत.

Advertisement

कंपनीने दोन महिन्यांत सलग दुसऱ्यांदा किंमतीत वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी या उत्पादनांच्या किमती दुसऱ्यांदा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डिसेंबर तिमाहीच्या कमाईनंतर व्यवस्थापनाने जे सांगितले होते त्याच्याशी सुसंगत किंमतीतील वाढ आहे. कच्च्या मालाची महागाई डिसेंबरच्या तिमाहीपेक्षा जास्त असल्यास टप्प्याटप्प्याने किमती वाढ करण्याचा विचार करणार असल्याचे कंपनीने डिसेंबरमध्ये सांगितले होते. HUL चे मुख्य वित्तीय अधिकारी रितेश तिवारी म्हणाले की, वाढत्या खर्चामुळे आमचे प्रथम प्राधान्य बचत करणे आणि नंतर टप्प्याटप्प्याने किमती वाढ करणे आहे.

Advertisement

कंपनीने फेब्रुवारीमध्ये साबण, सर्फ, डिशवॉश आणि इतर उत्पादनांच्या किमती 3-10 टक्क्यांनी वाढ केल्या आहेत. डिटर्जंट पावडर, विम बार अँड लिक्विड, लक्स आणि रेक्सोना सोप आणि पॉन्ड्स टॅल्कम पावडरच्या किमती वाढल्याचे दिसून आले आहे. या वर्षी जानेवारीमध्येही, HUL ने त्यांच्या व्हील, रिन, सर्फ आणि लाइफबॉय श्रेणीतील उत्पादनांच्या किमती 3-20 टक्क्यांपर्यंत वाढ केल्या होत्या.

Advertisement

चहा, क्रूड पामतेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने डिसेंबर आणि सप्टेंबर तिमाहीतही किमती वाढ केल्या होत्या. FMCG कंपनीने आवश्यक उत्पादनांच्या किमतीत वाढ केल्याने देशातील किरकोळ महागाईवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात इतर कंपन्याही उत्पादनांच्या किमतीत वाढ करू शकतात.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात किरकोळ महागाई वाढत आहे. जानेवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर महिन्यात 5.66 टक्क्यांवरून जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. डिसेंबरसाठी किरकोळ चलनवाढ 5.66 टक्क्यांपर्यंत सुधारली आहे.

Advertisement

रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जानेवारीमध्ये महागाईचा दर 6 टक्क्यांच्या आसपास असेल.रिजर्व्ह बँकेने महागाई दर 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2% मार्जिन दिले आहे. मात्र, महागाईने हा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.91 टक्के, ऑक्टोबरमध्ये 4.48 टक्के होती. एक वर्षाआधी डिसेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 4.59 टक्के होता.

Advertisement

अर्र.. श्रीमंत देशालाही महागाईचे चटके..! 30 वर्षांत प्रथमच घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply