Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ स्कूटरने केली कमाल..! काही वेळात सगळ्या स्कूटरची विक्री; पहा, स्कूटरमध्ये काय आहे खास..

मुंबई : Yamaha Motor India ने काही महिन्यांआधी देशात नवीन Aerox 155 MotoGP स्कूटर लाँच केली होती. ही स्कूटर पूर्णपणे विक्री झाली आहे. हे MotoGP मॉडेल मर्यादित संख्येत होते, त्यामुळे आता ते देशात पुन्हा लाँच होण्याची शक्यता कमी आहे. Aerox 155 MotoGP स्कूटर 3 कलर व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली होती.

Advertisement

Aerox 155 MotoGP ला LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, सिंगल चॅनल ABS, 5.8 इंच डिस्प्ले स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल घड्याळ, स्पीडोमीटर, टॅकोमीटर आणि ट्रिपमीटर, ऑटोमॅटिक स्टार्ट आणि स्टॉप सिस्टम, स्मार्ट मोटर जनरेटर सिस्टम, TCI इतर व्हेरियंट्स प्रमाणे मिळतात. इग्निशन, पोजिशन लाइट, व्हीव्हीए, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, फ्रंट डिस्क-ब्रेक, रिअर ड्रम-ब्रेक, यामाहा मोटरसायकल वाय-कनेक्ट अॅप फिचर यांसारखी सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Loading...
Advertisement

Aerox 155 MotoGP ला इतर प्रकारांप्रमाणेच 155 cc पेट्रोल इंजिन मिळते. ही स्कूटर 15PS पॉवर आणि 13.9Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह व्ही-बेल्ट ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मिळतो. त्याची किंमत 1.29-1.32 लाख रुपये आहे. त्याच वेळी ते 48.62 kmpl चा मायलेज देते. Yamaha Motor ने अलीकडेच देशातील आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये Aerox 155 मोटो स्कूटरचा समावेश आहे. R15 आधारित स्कूटरसाठी आता दोन हजार रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

Advertisement

बाब्बो.. होंडाने ‘या’ दुचाकीची किंमत 1 लाखाने केलीय कमी; पहा, असे नेमके काय घडले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply