Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या ‘त्या’ कारवाईने चीन हैराण.. चीनी कंपन्यांचे नुकसान टाळण्यासाठी केलीय ‘ही’ मागणी

दिल्ली : भारताने 220 हून अधिक चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर (Mobile App) घातलेल्या बंदीबाबत चीनने चिंता व्यक्त केली आहे. यामुळे चिनी कंपन्यांच्या हितसंबंधांवर परिणाम झाल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, निर्बंधांमुळे चिनी कंपन्यांचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे नुकसान होत आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने आपले व्यावसायिक वातावरण सुधारले पाहिजे आणि चिनी कंपन्यांसह सर्व परदेशी गुंतवणूकदारांशी न्याय्य, पारदर्शक आणि भेदभाव न करता वागले पाहिजे.

Advertisement

गाओ म्हणाले की, विशिष्ट कालावधीसाठी, संबंधित भारतीय विभाग देशातील चिनी उद्योग आणि संबंधित सेवांवर दबाव आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. ज्यामुळे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे गंभीर नुकसान होत आहे. यावर चीनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. उभय देशांमधील आर्थिक सहकार्याची सकारात्मक गती कायम ठेवण्यासाठी भारत योग्य त्या उपाययोजना करू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

रिपोर्ट्सनुसार, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या 54 चिनी अॅपवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने मागील आठवड्यात केली होती. याआधी जून 2021 मध्ये भारताने देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन TikTok, WeChat आणि Helo यांसह 59 चिनी मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. 29 जूनच्या त्या आदेशानुसार, गुप्तचर संस्थांनी बहुतेक बंदी घातलेल्या अॅपबाबत सांगितले होते, की ते वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत आहेत आणि कदाचित ते ‘बाहेर’ पाठवत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, एका अहवालानुसार, 2020-21 मध्ये, चीनमधून 65 अब्ज डॉलर आयात होती. यामध्ये सुमारे $ 39.5 अब्ज डॉलर किंमतीच्या विविध प्रकारच्या वस्तू होत्या. कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फार्मा आणि रासायनिक क्षेत्रातील उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने PLI योजना जाहीर केल्या आहेत. PLI योजनांमुळे चीनमधून होणारी आयात 20 टक्क्यांनी कमी करू शकलो, तर देशाचा GDP (Gross Domestic Product) 8 अब्ज डॉलरने वाढू शकतो.

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत भारताने चीनकडून $68 अब्ज किमतीची उत्पादने आयात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, कोरोना संकटात गेल्या वर्षी भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत (export) वाढ झाली होती. गेल्या वर्षात चीनला निर्यात 34 टक्क्यांनी वाढून $22.9 अब्ज झाली. कोरोनाआधी 2019 मध्ये ही निर्यात 17.1 अब्ज डॉलर होती.

Advertisement

.. तर ‘तशा’ पद्धतीने चीनला बसेल जोरदार झटका; पहा, सरकारने कोणता निर्णय घेणे गरजेचे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply