‘Google’ मुळे तुमचे पैसे वाचणार.. पण, कंपन्यांना बसणार कोट्यावधींचा फटका; पहा, गुगल कसा करणार बंदोबस्त ?
मुंबई : तुम्हाला माहिती आहे का की तुमचे प्रत्येक लोकेशन स्मार्टफोनवरून ट्रॅक केले जाते. आणि मग त्यानुसार जाहिरात तुम्हाला दिसतात. पण लवकरच तुमचे लोकेशन ट्रॅकिंग बंद केले जाईल. खरं तर, Google ने बुधवारी Android ऑपरेट सिस्टमवर जाहिरात ट्रॅकिंग मर्यादित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे युजर्सना केवळ प्रायव्हसी मिळणार नाही, तर अनावश्यक जाहिरातींपासूनही सुटका मिळेल. Google ने Apple iPhone वापरकर्त्यांसाठी आधीच Ad Tracking फिचर आणले आहे. जे Android उपकरणांसाठी लागू केले जाईल.
Google ने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, की ते जाहिरातीसंदर्भात सूचना पाठवेल. Google तृतीय पक्षांसह जाहिराती मर्यादित करेल. तसेच जाहिरात आयडीसह अॅप ओळख करण्यास सक्षम असेल. Google ने वर्षाच्या अखेरीस प्रायव्हसी सँडबॉक्स बीटा लाँच करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे फेसबुकला तब्बल 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच इतर अनेक टेक कंपन्यांनाही धक्का बसणार आहे.
Google ने सांगितले, की ते Snap आणि Activision Blizzard सारख्या अॅप निर्मात्यांबरोबर काम करणार आहे. ज्यामुळे थर्ड-पार्टी अॅप सहजासहजी युजर्सपर्यंत पोहोचणार नाहीत. 2023 च्या अखेरीस, ते त्याच्या Chrome ब्राउझरमधील ट्रॅकिंग तंत्रज्ञान काढून टाकेल.
जगातील बहुतेक स्मार्टफोन, टॅब्लेट Google आणि Apple च्या ऑपरेट सिस्टमवर काम करतात. म्हणजे Android किंवा iOS वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत अॅपलनंतर अँड्रॉइड उपकरणांवर कमी जाहिरातीमुळे वापरकर्ते अनावश्यक खरेदी करणार नाहीत. सध्याच्या जमान्यात, थर्ड पार्टी अॅप वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय अनेक ऑफर्स आणि जाहिराती देतात. अशा जाहिराती कधी कधी फसवणुकीचे कारण बनतात. तसेच, ऑफर आणि जाहिरातींमुळे वापरकर्ते अतिरिक्त खरेदी करतात. पण, गुगलने या प्रकारांचा बंदोबस्त करण्याचा जबरदस्त प्लान आखला आहे. गुगलची ही योजना प्रत्यक्षात आली तर कंपन्यांचे अब्जावधींचे नुकसान ठरलेले आहे.
भारीच.. लवकरच बदलणार तुमचे Gmail; गुगलने केलीय मोठी घोषणा.. पहा, काय नवीन फिचर येणार..?