Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता.. तरीही ‘या’ 8 शहरांमध्ये घरांची जोरदार विक्री; पहा, कसा घडलाय ‘हा’ चमत्कार..?

मुंबई : सिमेंट आणि स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षभरात घरांच्या किमती (Real Estate) 3 ते 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्म PropTiger.com ने एका अहवालात ही माहिती दिली आहे. PropTiger.com ने त्यांच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – अॅन्युअल राऊंड-अप 2021’ अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षाच्या 1,82,639 युनिट्सवरून 2021 मध्ये घरांची विक्री 13 टक्क्यांनी वाढून 2,05,936 युनिट्स झाली आहे. PropTiger ने सांगितले, की 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये नवीन पुरवठ्यात वेगाने वाढ झाली आहे आणि हा आकडा 1.22 लाख युनिट्सवरून 2.14 लाख युनिट्सपर्यंत वाढला आहे, जे 75 टक्के वाढ दर्शवते.

Advertisement

हाउसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉपटाइगर डॉट कॉम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील रिअल इस्टेट मार्केटने वेगाने पुनरागमन केले आहे आणि सरकारी पाठिंब्यामुळे या क्षेत्राला गती मिळत राहील. टॉप-8 शहरांबद्दल सांगितले तर अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये घरांच्या किमतीत 7 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये 6 टक्के, पुण्यात 3 टक्के आणि मुंबईत 4 टक्के वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर, कोलकाता आणि चेन्नईने 5 टक्के वाढ नोंदवली.

Advertisement

घरांच्या विक्रीबद्दल सांगितले तर, अहमदाबादमध्ये 39%, बेंगळुरूमध्ये 7 टक्के, चेन्नईमध्ये 25 टक्के, दिल्ली-एनसीआरमध्ये 1 टक्के, हैदराबादमध्ये 36 टक्के, कोलकातामध्ये 9 टक्के, मुंबईमध्ये 8 टक्के, पुण्यात 9 टक्के वाढ झाली आहे. 2022 मध्येही रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ असेल, असे अहवालात म्हटले आहे.

Loading...
Advertisement

Makaan.com आणि PropTiger.com चे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, आरबीआय पतधोरण आढाव्यानंतर असे सांगण्यात आले की, प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय अपेक्षेप्रमाणे आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा अर्थ असा आहे, की गृहकर्जाचे व्याजदर कमी पातळीवर राहतील. यामुळे खरेदीदारांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले, की यामुळे रिअल इस्टेट उद्योगाला मोठी चालना मिळेल तसेच सरकारला घरांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.

Advertisement

अर्र.. घर खरेदीदारांसाठी आलीय टेन्शन देणारी बातमी; नव्या वर्षातही जादा खर्च करण्याची तयारी ठेवा; पहा, काय म्हणतोय अहवाल ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply