Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपने पाडलाय आश्वासनांचा पाऊस.. पहा, काय-काय मिळणार मोफत..?

दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी 2022 मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये प्रादेशिक अखंडता आणि मणिपूर स्थानिक लोकांच्या हक्कांचे आणि समृद्ध संस्कृतीचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करून काही महत्वाचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

राज्यातील सर्व पंतप्रधान उज्ज्वला लाभार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येईल, राज्यातील सर्व गुणवंत महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दुचाकी दिली जाईल. जाहीरनाम्यात मोफत लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले आहे, जे 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी वितरित केले जातील. राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मासिक पेन्शन 200 रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची आर्थिक मदत वार्षिक 6 हजार रुपयांवरून 8 हजारांपर्यंत वाढ करण्यात येईल.

Advertisement

पदवी आणि पदव्युत्तर तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशीप दिली जाईल. मणिपूरमधील तरुणांना विविध क्षेत्रात कौशल्ये प्रदान करण्यासाठी मणिपूर कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली जाईल. राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मणिपूरमध्ये AllMS (All India Institute of Medical Sciences) ची स्थापना केली जाईल. याशिवाय आयुष्मान भारत योजनेचे 100 टक्के कव्हरेज सर्व पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा प्रदान करेल.

Loading...
Advertisement

तंत्रज्ञान अपग्रेडेशन, भांडवलाची आवश्यकता आणि बाजारपेठेत चांगला प्रवेश सक्षम करण्यासाठी एमएसएमईंना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. 25 लाखांपर्यंत शून्य व्याज कर्ज देण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या स्टार्ट-अप निधी तयार केला जाईल. स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार, अशी आश्वासने भाजपने या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Advertisement

‘नाव लिहा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा’..! ‘त्या’ भाजप राज्यात सुरू होणार अभियान; पहा, काय आहे विरोधकांचा प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply