Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Reliance Jio ला जोरदार झटका..! म्हणून ‘इतक्या’ ग्राहकांनी सोडली साथ; पहा, काय आहे नेमके कारण..?

मुंबई : डिसेंबर 2021 मध्ये देशात मोबाइल वापरकर्त्यांची (Mobile User) संख्या 1.28 कोटींनी कमी झाली आहे. ट्राय डेटानुसार, (TRAI Data) रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) खूप त्रास सहन करावा लागला आहे. परंतु भारती एअरटेलने (Airtel) चांगली कामगिरी करत नवीन ग्राहक जोडले आहेत. रिलायन्स जिओने (Reliance Jio) सुमारे 1.29 कोटी ग्राहक गमावले आणि डिसेंबर 2021 मध्ये कंपनीच्या मोबाइल ग्राहकांची संख्या आधार 41.57 कोटींपर्यंत कमी झाली आहे. कंपनीला हा जोरदार झटका बसण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, कंपनीने रिचार्ज प्लानच्या किंमतीत केलेली दरवाढ आहे, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

Vodafone Idea ने डिसेंबर 2021 मध्ये 16.14 लाख मोबाईल ग्राहक गमावले आणि आता कंपनीकडे 26.55 कोटी ग्राहक राहिले आहेत. याउलट, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या ग्राहकांच्या माहितीनुसार, एअरटेलला डिसेंबरमध्ये 4.75 लाख ग्राहक मिळाले आणि त्याचा वायरलेस वापरकर्ता आधार 35.57 कोटी झाला आहे.

Advertisement

डिसेंबरमध्ये एकूण 8.54 दशलक्ष मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) विनंत्या करण्यात आल्या, त्यापैकी 4.91 दशलक्ष विनंत्या विभाग-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 दशलक्ष विनंत्या विभाग-2 मधून आल्या. MNP विभाग एकमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विनंत्या आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये विभाग दोन मध्ये सर्वाधिक MNP विनंत्या आहेत.

Loading...
Advertisement

मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36%, त्यानंतर भारती एअरटेल 30.81%, व्होडाफोन आयडिया 23%, BSNL आणि MTNL चे अनुक्रमे 9.90% आणि 0.28% आहेत. BSNL देशभरात 4G नेटवर्क सुरू करण्यापासून दूर आहे. ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस खासगी दूरसंचार कंपन्यांकडून लागू करण्यात आलेली प्रीपेड दरवाढ. यामुळे खासगी कंपन्यांना कमी पैसे देणारे प्लान एकतर बंद करता आले किंवा किंमतीत वाढ करुन सुधारीत करता आले. कंपन्यांना यामुळे जास्त पैसे मिळाले असतीलही मात्र त्यांचे ग्राहक कमी झाले आहेत.

Advertisement

BSNL ने महिन्याभरात प्रभावीपणे जास्तीत जास्त ग्राहक जोडले. टेलिकॉम कंपनीचे 4G नेटवर्क एकदा सुरू झाले की ते अधिक किफायतशीर असल्याने लोक खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा त्याला प्राधान्य देतील याचा हा पुरावा आहे. या डेटामुळे बीएसएनएलचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

Advertisement

टेलिकॉम कंपन्या पु्न्हा करणार मनमानी.. ‘या’ कंपन्या सर्वात आधी करू शकतात दरवाढ.. पहा, काय आहे प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply