Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त दीड महिन्यात ‘या’ सरकारी कंपनीने केले मालामाल; गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, पहा, काय केलीय कमाल..?

मुंबई : एका सरकारी कंपनीने यावर्षी जोरदार परतावा दिला आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीड महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. ही सरकारी कंपनी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GMDC) आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4,500 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनी गुजरात सरकारच्या मालकीची आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यातील 151.95 रुपये या सर्वाधिक पातळीवर आहे.

Advertisement

गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GMDC) चे शेअर्स 3 जानेवारी 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 73.75 रुपये होते. 16 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 142.25 रुपयांवर बंद झाले. या दीड महिन्यात कंपनीच्या समभागांनी सुमारे 93 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने या वर्षात 3 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे सुमारे 1.93 लाख रुपये झाले असते. म्हणजेच दीड महिन्यात गुंतवलेले पैसे जवळपास दुप्पट झाले असतील.

Advertisement

22 सप्टेंबर 2000 रोजी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स BSE वर 3 रुपयांच्या पातळीवर होते. 16 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 142.25 रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 22 सप्टेंबर 2000 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर या पैशाचे सध्याचे मूल्य 47.41 लाख रुपये झाले असते. GMDC समभागांचा 52 आठवड्यांतील 52 रुपये ही सर्वात कमी पातळी आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, शेअर बाजारातील IPO तेजीच्या काळातही काही कंपन्या मात्र सतर्क राहत आहेत. सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. आयपीओद्वारे कंपन्या आणि गुंतवणूकदार चांगली कमाई करत आहेत. मात्र, अशाही काही कंपन्या आहेत ज्यांची कामगिरी अतिशय खराब होत आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत, त्या काळजीत पडल्या आहेत. काही कंपन्या आपले प्लान पुढे ढकलत आहेत. पेटीएम आणि झोमॅटोचे भवितव्य पाहून ओयो हॉटेल्स आणि आणखी एका कंपनीने त्यांच्या आयपीओची तारीख पुढे ढकलली आहे, जे मोठ्या प्रमाणात नोंदणी केले आहेत.

Advertisement

शेअर बाजारात तेजी कायम, केंद्राच्या बजेटवर गुंतवणूदार खूश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply