आजही सोन्याला बसलाय झटका..! पहा, किती रुपयांनी घटलेत भाव; सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर
मुंबई : देशातील सर्व राज्यांमध्ये सोने-चांदीचे दर एकसारखे नसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे राज्यांचे कर आणि उत्पादन शुल्क वेगळे आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे दर एक सारखे नसतात. आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 220 रुपयांनी घसरून 50,400 रुपयांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 200 रुपयांनी घसरून 46,200 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील मोठ्या शहरात आज सोन्याचे काय भाव आहेत, याबाबत माहिती घेऊ या..
राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात 24 कॅरेट सोने 50,390 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,390 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,830 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,630 रुपये आहे. कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,390 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे. बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोने 50,390 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे. हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोने 50,390 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे.
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,380 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,180 रुपये आहे. जयपूरमध्ये 24 कॅरेट सोने 50,380 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,290 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोने 50,370 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,170 रुपये आहे. केरळमध्ये 24 कॅरेट सोने 50,390 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,190 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,550 रुपये आहे. तर 22 कॅरेटची किंमत 46,140 रुपये आहे.
दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.
खुशखबर..! आज आहे स्वस्त सोने खरेदीची संधी.. पहा, एकाच दिवसात किती घटलेत सोन्याचे भाव ?