Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. अगदी कमी पैशात मिळतात ‘हे’ 4G फोन; फिचरही आहेत एकदम खास; चेक करा, डिटेल..

मुंबई : देशातील स्मार्टफोन मार्केट जगातील अन्य देशांच्या तुलनेत खूप मोठे आहे. त्यामुळे येथे रोज नवीन फोन येत असतात. आता मोबाइल कंपन्या 5G नेटवर्कच्या दिशेने निघाल्या आहेत. देशात काही दिवसात 5G नेटवर्क सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकार आणि खासगी कंपन्या दोन्हीही यासाठी प्रयत्न करत आहे. हे नेटवर्क कधी मिळेल, याबाबत मात्र अद्याप स्पष्ट नाही. देशात सध्या खासगी टेलिकॉम कंपन्या 4G नेटवर्क देत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये जास्तीत जास्त स्मार्टफोन 4G ला सपोर्ट करणारे दिसतात. काही फोनच्या किंमती खूप जास्त आहेत. तर काही आपल्या बजेटमधीलही फोन आहेत. असेच काही कमी किंमतीतील 4G स्मार्टफोनची माहिती आज आम्ही देणार आहोत.

Advertisement

Jio Phone 4G फक्त 1499 रुपयांना खरेदी करता येईल. या किंमतीत एक उपकरण आणि एक वर्षासाठी अमर्यादित कॉल आणि डेटा उपलब्ध आहे. या 4G फीचर फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आहे. स्टोरेज वाढ करण्यासाठी यामध्ये SD कार्डही इन्स्टॉल केले जाऊ शकते. त्यात एफएमचा पर्यायही आहे.

Advertisement

Itel Magic2 4G Volte मध्ये 2.4 इंच डिस्प्ले आहे आणि तो WiFi सपोर्टसह येतो. त्याची किंमत 2549 रुपये आहे. यामध्ये 2000 हून अधिक संपर्क सेव्ह केले जाऊ शकतात आणि यात 1900 mAh बॅटरी आहे.

Loading...
Advertisement

BlackZone XR 4G देखील 2299 रुपयांना खरेदी करता येईल. यात 3000 mAh बॅटरी आहे. यात 2.4 इंच डिस्प्ले देखील आहे. यात कॉल रेकॉर्डिंगचीही सुविधा आहे.

Advertisement

Nokia 110 4G VoLTE 2899 रुपयांना खरेदी करता येईल. यात 32 GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये गेम आणि फ्लॅशलाइटचा पर्याय देण्यात आला आहे. G VoLTE सह, यामध्ये HD व्हॉइस कॉल देखील उपलब्ध आहेत. यात 1.8 इंच डिस्प्ले आणि मागील पॅनलवर 0.8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Advertisement

कमी पैशात स्मार्टफोन घ्यायचाय..? ; मग, लवकरच येतोय ‘हा’ दमदार स्मार्टफोन; पहा, काय आहेत हटके फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply