Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानमध्ये शेतकरी संतापले..! सरकारला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; पहा, कोणता निर्णय ठरतोय वादग्रस्त ?

दिल्ली : पाकिस्तानातील कृषी संकट अधिक गडद होत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने कर्ज मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सर्व कर सवलती मागे घेतल्या आहेत आणि नवीन कर लागू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कृषी संकट वाढत असून अनेक शहरांमध्ये आंदोलने होत आहेत. राजकीय पक्ष आणि पाकिस्तानच्या लोकांचा विरोध असूनही, इम्रान खान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून कर्ज मिळविण्यासाठी जानेवारी 2022 मध्ये विविध कर सवलती मागे घेतल्या आहेत. यामुळे देशातील शेतकरी सरकारवर चांगलेच संतापले आहेत.

Advertisement

सरकारच्या या निर्णयानंतर तज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर गंभीर नकारात्मक परिणामांचा इशारा दिला होता. आणि आर्थिक निर्णयाचा पहिला फटका कृषी क्षेत्राला बसलेला दिसतो. इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटी (IFFRAS) नुसार, शेतकरी आता या मुद्द्यावर सरकारचा जोरदार विरोध करत आहेत.

Advertisement

आयएफआरएएसने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनीही शेतकर्‍यांना आपला पाठिंबा दिला आहे. कर सूट कमी करण्याच्या दुर्दैवी निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी अर्थव्यवस्थेला तडा गेला आहे. खतांची टंचाई आणि वाढलेले बियाणे दर यांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशातील शेतकरी बहुतांश युरियाचा वापर खत म्हणून करतात आणि त्याच्या कमतरतेमुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

Advertisement

मका बियांण्यांची किंमत 3,000 (पाकिस्तानी रुपये) वरून 5,000 पर्यंत वाढली आहे. IFFRAS नुसार, पाकिस्तानमधील शेतकरी प्रतिकूल हवामान आणि बाजार परिस्थितीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सर्व कर सवलती काढून घेण्याच्या निर्णयामुळे देशातील कृषी संकटात वाढ झाली आहे. सरकारच्या कृषी खते, बियाणे आणि अन्य नवीन करांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Loading...
Advertisement

सरकारने त्यांच्या समस्यांचे निराकरण न केल्यास 20 फेब्रुवारीपासून पंजाब विधानसभेसमोर धरणे आंदोलन करण्याची धमकीही देण्यात आली आहे. देशातील नागरिक तर सरकारवर आधीच संतापले आहेत त्यात आता शेतकरी वर्गही नाराज झाला आहे. त्यात त्यांना विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Advertisement

ठरलं तर..! ‘या’ दिवशी ‘त्या’ लोकांसाठी भारत पाठवणार गहू; पाकिस्ताननेही घेतलीय माघार..

Advertisement

पाकिस्तानच्या आडमुठेपणाचा अजब नमुना; पहा भारत-अफगाणिस्तानच्यामध्ये काय करतोय खेळी

Advertisement
Advertisement

Leave a Reply