Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. श्रीमंत देशालाही महागाईचे चटके..! 30 वर्षांत प्रथमच घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार..

दिल्ली : महागाई सातत्याने वाढत आहे. जगभरात ही समस्या (Rising Inflation) गंभीर होत चालली आहे. जानेवारीमध्ये ब्रिटेनमधील महागाईचा दर 30 वर्षांत सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. मार्च 1992 नंतरची ही सर्वाधिक पातळी आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनमधील ग्राहक किंमत निर्देशांक 5.5 टक्के होता. वाढत्या महागाई पाहता देशातील मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करेल अशी अपेक्षा आहे. महागाईमुळे देशातील कुटुंबांचे बजेट बिघडले आहे.

Advertisement

सांख्यिकी कार्यालयाने (Office for National Statistics) बुधवारी सांगितले की, जानेवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (consumer price index) 5.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये तो 5.4 टक्के होता. हा ताजा आकडा मार्च 1992 नंतरचा सर्वाधिक आहे. त्यावेळी ब्रिटनमध्ये महागाईचा दर 7.2 टक्क्यांवर पोहोचला होता. त्याच वेळी, अमेरिकेतील महागाईचा दर गेल्या जवळपास चार दशकांत 7.5 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे, युरो चलन वापरणाऱ्या 19 देशांमध्ये चलनवाढीचा दर विक्रमी 5.1 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Advertisement

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्रिटेनच्या मध्यवर्ती बँकेने जानेवारीमध्ये सांगितले होते, की चलनवाढ सध्या वाढतच राहील. एप्रिलमध्ये तो 7.25 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. घरगुती वीज पुरवठ्याचे बिल सरासरी दीडपट होईल. वाढत्या चलनवाढीमुळे केंद्रीय बँकेवर व्याजदर वाढ करण्यासाठी दबाव आला आहे. बँकेने याआधीच दोनदा व्याजदरात वाढ केली आहे. डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच व्याजदर 0.10 टक्क्यांवरून 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. 3 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा 0.50 टक्के करण्यात आले. मार्च महिन्यात ते 0.75 टक्के किंवा 1 टक्के केले जाईल, असे मानले जात आहे.

Loading...
Advertisement

पुढील वर्षात ऊर्जेच्या किमतीत मोठी घसरण होईल, त्यामुळे महागाई कमी होण्याचा वेग वाढेल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय जागतिक पुरवठा साखळीही मजबूत केली जाईल. रशिया आणि युक्रेन संकटादरम्यान कच्च्या तेलाने $96 ची पातळी गाठली आहे. तथापि, याक्षणी ते $ 94 च्या पातळीवर आहे.

Advertisement

बाब्बो.. ‘हा’ श्रीमंत देश सु्द्धा अडकलाय कर्जाच्या विळख्यात; पहा, कशामुळे आलीय उधार घेण्याची वेळ..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply