Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. आता फक्त चार दिवस कामकाज..! तीन दिवस हक्काची सुट्टी; पहा, कुणी घेतलाय ‘हा’ निर्णय ?

दिल्ली : साधारणपणे, कर्मचारी आणि कामगारांशी संबंधित कामगार कायदे सुधारत राहतात. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून अनेक देशांमध्ये आठवड्यातून चार दिवस कामकाज करण्याचे निर्णय घेतले जात आहेत. तो एक पर्याय म्हणून पुढे आला आहे. यामध्ये आता बेल्जियमचीही भर पडली आहे. या देशात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात न करता आठवड्यातून चार दिवस कामकाज करण्याचा पर्याय दिला आहे. कामगार संघटना आणि व्यावसायिक गट यांच्यात एक करार झाला आहे.

Advertisement

बेल्जियममध्ये बऱ्याच काळापासून, कामगार कायद्यांच्या सुधारणांची मागणी होत होती. त्यानंतर कामगार संघटना आणि व्यावसायिक गटांमध्ये दीर्घ चर्चा झाली. आता निर्णय घेत सरकारने आठवड्यातून चार दिवस कामकाज करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Advertisement

बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रू यांनी कोविड-19 संकटाचा संदर्भ देत म्हटले आहे की, आम्ही दोन कठीण वर्षे अनुभवली आहेत. या निर्णयामुळे आम्ही अधिक नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न केला आहे. लोक आणि अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

Loading...
Advertisement

या निर्णयामुळे आता कर्मचारी 5 दिवसांऐवजी चार दिवसच कामकाज करतील आणि त्यांना 38 तास म्हणजे दिवसातील साडे नऊ तास कामकाज करावे लागणार आहे. नवीन कायद्यांमुळे कर्मचार्‍यांना आठवड्यात जास्त तास कामकाज करण्याची मुभा देण्यात आली आहे जेणेकरून आठवड्यातील काम वेळेत पूर्ण होईल आणि पुढच्या आठवड्यातही कमी दिवस कामकाज करता येईल. आठवड्यातून चार दिवस कामकाज करण्यासाठी संबंधित कंपनीची परवानगी घ्यावी लागते. याचे कारण कर्मचाऱ्याला लेखी द्यावे लागेल. प्रस्तावित नियम सध्या मसुद्याच्या स्वरूपात आहेत आणि संसदेने ते पारित करणे आवश्यक आहे.

Advertisement

आता फक्त 5 दिवसच कामकाज.. दोन दिवस हक्काची सुट्टी.. पहा, कुठे घेतलाय ‘हा’ निर्णय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply