Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून ‘या’ कंपन्या घाबरल्या; IPO संदर्भात कंपन्यांनी घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण..?

मुंबई : शेअर बाजारातील IPO तेजीच्या काळातही काही कंपन्या मात्र सतर्क राहत आहेत. सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. आयपीओद्वारे कंपन्या आणि गुंतवणूकदार चांगली कमाई करत आहेत. मात्र, अशाही काही कंपन्या आहेत ज्यांची कामगिरी अतिशय खराब होत आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत, त्या काळजीत पडल्या आहेत. काही कंपन्या आपले प्लान पुढे ढकलत आहेत. पेटीएम आणि झोमॅटोचे भवितव्य पाहून ओयो हॉटेल्स आणि आणखी एका कंपनीने त्यांच्या आयपीओची तारीख पुढे ढकलली आहे, जे मोठ्या प्रमाणात नोंदणी केले आहेत.

Advertisement

वास्तविक, पेटीएम आणि झोमॅटो त्यांच्या ऑफर किंमतीपेक्षा खूप जास्त प्रीमियमवर लिस्ट केले होते. इतकेच नव्हे तर दोन्ही समभागांनी अल्पावधीत दीडपट परतावाही गाठला. मात्र नुकत्याच झालेल्या बाजारातील घसरणीमुळे दोन्ही समभागांची स्थिती दयनीय झाली. मार्केटमध्ये अशी परिस्थिती पाहून ऑनलाइन हॉटेल बुकिंग स्टार्टअप ओयोने त्यांचा आयपीओ काही काळासाठी पुढे ढकलला आहे.

Advertisement

ओयोने मागील वर्षी SEBI कडे $1.3 अब्ज IPO साठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि त्याचे मूल्यांकन आणि मालकीबाबत प्रश्न उपस्थित झाले. सिकोया कॅपिटल आणि सॉफ्ट बँक सारखे दिग्गज गुंतवणूकदार असलेली ही कंपनी 5 महिन्यांहून अधिक काळ मंजुरीसाठी वाट पाहत आहे.

Loading...
Advertisement

एका अहवालात म्हटले आहे, की 2022 मध्ये IPO ची कामगिरी खराब झाली आहे. 2019 मध्ये, IPO ने सुमारे 42 टक्के परतावा दिला होता. त्यानंतर 2020 मध्ये परतावा 30 टक्क्यांच्या आसपास पोहोचला. 2021 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक परतावा आला होता, मात्र या वर्षी आतापर्यंत 7.70 टक्क्यांनी घट झाली आहे. पेटीएमचे शेअर्स त्याच्या IPO किमतीपेक्षा 60 टक्क्यांनी कमी व्यवहार करत आहेत.

Advertisement

‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची बातमी, पाॅलिसीधारकांचीही होणार चांदी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply