Tesla कंपनीला करावे लागेल ‘हे’ काम.. तरच मिळेल एन्ट्री; पहा, काय मिळालाय नवीन अपडेट..
मुंबई : जगातील आघाडीच्या टेस्ला (tesla) या इलेक्ट्रिक कार कंपनीस अजूनही भारतात एन्ट्री मिळालेली नाही. आता याबाबत महत्वाची बातमी मिळाली आहे. याआधी, कंपनी देशात आपली वाहने विकण्यासाठी सरकारकडून आयात शुल्कात (import duty) कपात करण्याची मागणी करत होती. ज्यावर सरकार कंपनी देशात कारखाना सुरू करण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. पण आता एका अहवालानुसार, केंद्र सरकारला टेस्लाने देशात आयात कर सूट मिळण्यासाठी $500 दशलक्ष किमतीचे स्थानिक ऑटो घटक खरेदी करावेत, असे अपेक्षित आहे.
एलन मस्क यांना केंद्र सरकारने टेस्ला कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार देशातील बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र केंद्र सरकार अजिबात तयार नाही. अलीकडेच केंद्र सरकारकडून मस्क यांच्या दबावाचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.
टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. सरकारने इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेकदा म्हटले आहे. तथापि, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला कडक शब्दात सांगितले होते की, टेस्ला देशात येईल आणि आधी कार बनवेल, नंतर कोणत्याही सूटबाबत विचार केला जाईल. सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, टेस्लाला सूट देऊन संपूर्ण वाहन उद्योगाला वेगळा संदेश द्यायचा नाही कारण अनेक देशांतर्गत कंपन्यांनी येथे मोठी गुंतवणूक केली आहे.
ऑटो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे नाही. येथे टाटा आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांसह, मारुती, ह्युंदाई, एमजी, मर्सिडीज, ऑडी आणि जेएलआर सारख्या कंपन्या आधीच त्यांच्या उत्पादनांसह बाजारात आहेत. अशा स्थितीत टेस्लासाठी येथील बाजारपेठ खूप आव्हानात्मक आहे. Mordor Intelligence च्या अहवालानुसार, भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजार 2026 पर्यंत $47 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, कोरोना संकट असूनही केंद्र सरकारच्या धोरणांमुळे येथील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अपेक्षेपेक्षा वेगाने वाढत आहे.
सरकारने टेस्लाला फटकारले..! कंपनीचा ‘तो’ प्लान यशस्वी होऊ देणारच नाही; पहा, काय आहे कंपनीचा प्लान ?