Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तालिबान्यांनी अमेरिकेला धमकावले..! ‘त्या’ पैशांबाबत दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; पहा, काय सुरू आहे राजकारण..

दिल्ली : तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे की अफगाणिस्तानची जप्त केलेली $7 अब्ज डॉलर्स संपत्ती परत न मिळाल्यास ते अमेरिकेबरोबरच्या धोरणावर पुनर्विचार करेल. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षण क्षेत्रासाठी युरोपियन प्रतिनिधींकडून 11 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. अफगाण तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, की 11 सप्टेंबरच्या घटनेशी अफगाणिस्तानचा काहीही संबंध नाही. जर अमेरिकेने या धोरणात बदल केला नाही तर तालिबान राजवटीला अमेरिकेबद्दलच्या आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अफगाणिस्तानच्या जप्त केलेल्या पैशांद्वारे दोन टप्प्यात मदत देण्याचे जाहीर केले होते. तब्बल 7 अब्ज डॉलरच्या या रकमेतून 9/11 च्या दहशतवादी हमल्यातील पिडीतांना नुकसान भरपाई आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना मदत देणार असल्याचे सांगितले होते. 11 सप्टेंबर रोजी अमेरिकेत मोठा दहशतवादी हमला झाला होता. यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचेच राज्य होते.

Advertisement

तालिबानचे परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी दोहा येथे युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्याच वेळी, तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले, की त्यांना त्यांच्या देशातील नागरिकांना मानवतावादी मदत करण्यासाठी युरोपियन युनियनकडून $ 11 दशलक्ष आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. समाजातील सर्व घटकांना त्यांचे हक्क देण्यास तयार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Loading...
Advertisement

दरम्यान, अमेरिका आता जप्त केलेली अफगाणिस्तानची $7 अब्ज संपत्ती मुक्त करेल. या पैशाचे दोन भाग केले जातील, त्यानंतर त्यातील एक भाग अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी मानवतावादी मदत आणि दुसरा भाग 9/11 च्या दहशतवादी हमल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी दिला जाईल. स्थानिक खामा प्रेसनुसार, अमेरिकेच्या या निर्णयावर तालिबानी नेते मात्र चांगलेच भडकले आहेत. संयुक्त राष्ट्रांतील तालिबानचे राजदूत यांनी सांगितले, की हा पैसा फक्त अफगाणिस्तानच्या लोकांचा आहे, असे तालिबानने आधी म्हटले होते.

Advertisement

भारतही अफगाणिस्तानला मदत करणार आहे. यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. या संकटग्रस्त देशाची मदत करण्यासाठी बजेटमध्ये 200 कोटी रुपये तरतूद केली आहे. ही मदत भारत अफगाणिस्तानला देणार आहे. मात्र, तेथील परिस्थिती लक्षात घेऊनच मदत केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे, या देशातून भारता विरोधात कारवाया होणार नाही, पाकिस्तानी दहशतवाद्यांना येथून कोणतीही मदत मिळणार नाही, या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणार आहे. त्यानंतरच अफगाणिस्तानला मदत द्यायची की नाही, याबाबत निर्णय होऊ शकतो.

Advertisement

.. म्हणून अमेरिकेवर भडकलेत तालिबानी..! अमेरिकेने ‘त्या’ जप्त केलेल्या पैशांचे केलेय ‘असे’ काही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply