Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाहनचालकांसाठी आलीय खुशखबर..! आता ‘त्यासाठी’ पैसे द्यावे लागणार नाही; पहा, कुणी घेतलाय हा निर्णय

मुंबई : वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडून टोल टॅक्स (toll tax) आकारला जाणार नाही. या संदर्भात टोल करासंदर्भातील धोरणात नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी आणि लोकांना टोल भरण्याचा त्रास या दोन्हीपासून सुटका होणार आहे. वास्तविक हा निर्णय मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh Govt) घेतला आहे. तेथे, व्यावसायिक वापरात नसलेल्या कार आणि इतर वाहनांसारख्या खाजगी चालकांना टोल करामधून सूट दिली जाईल. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (road development corporation) नवीन रस्त्यांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Advertisement

हे नवीन धोरण आणण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने 200 रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये 80 टक्के कर हा व्यावसायिक वाहनांमधून आणि केवळ 20 टक्के छोट्या वाहनांमधून असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निर्णय घेतला की, जेव्हा खासगी वाहनांकडून कराचा इतका कमी वाटा मिळत असेल तर त्यांना करात सवलत द्यावी.

Advertisement

यानंतर टोल करासंदर्भातील धोरणात नवीन तरतुदी करण्यात आल्या. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो वाहन चालकांना होणार आहे. त्यांना आता टोलवर पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच येथे नेहमी होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. त्यामुळेही वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे. वेळ वाचणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या वाहतूक कोंडीमुळे विनाकारण वाया जाणारे इंधनाचीही बचत होणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, वाहनांबाबत केंद्र सरकारनेही अनेक नवीन नियम केले आहेत. या नियमांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेवर जास्त भर देण्यात आला आहे. वाहन चालकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाहन कंपन्यांनाही काही महत्वाचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना (electric vehicle) प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. या वाहनांची विक्रीत वाढ व्हावी, यासाठी अनुदान आणि अन्य योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. राज्य सरकारे सुद्धा त्यांच्या पातळीवर काही योजना राबवत आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आज देशात इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू मागणी वाढत चालली आहे.

Advertisement

आलाय नवा नियम, मुलांना मोटारसायकलवरून नेताना ‘त्याची’ही आवश्यकता

Advertisement
Advertisement

Leave a Reply