मुंबई : नोकरदार लोकांसाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. यावर्षी देशातील पगारवाढ (salary-increment) 9.9 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. ही 5 वर्षातील सर्वाधिक पातळी आहे. आघाडीच्या जागतिक व्यावसायिक सेवा फर्म एओएनच्या 26 व्या वेतन वाढीच्या सर्वेक्षणानुसार, 2021 मध्ये पगारवाढीची पातळी 9.3 टक्के होती. गेल्या वर्षात 2022 च्या तुलनेत यावर्षात 0.6% वाढ झाली आहे. 40 हून अधिक उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण केलेल्या अभ्यासात ही माहिती आढळली. पगारातील सर्वाधिक वाढ ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल, हायटेक/आयटी आणि आयटीईएस आणि लाइफ सायन्सेसशी (life science) संबंधित व्यवसायांमध्ये अपेक्षित आहे.
कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट असूनही, ही पगारवाढ BRIC (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) देशांमध्ये सर्वाधिक आहे. सर्वेक्षणानुसार, ब्राझीलमध्ये 5.0 टक्के, रशियामध्ये 6.1 टक्के आणि चीनमध्ये 6.0 टक्के पगारवाढ होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे याच काळात देशातील आयटी कंपन्यांची मात्र चांदी झाली आहे. होय, या घातक संकटाच्या काळातही कंपन्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. 2021-22 मध्ये 15.5 टक्के वाढीसह देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्पन्न 227 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. ही वाढ गेल्या दशकातील कोणत्याही आर्थिक वर्षातील सर्वाधिक आहे. आयटी उद्योगातील संघटना नासकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले, की 2021-22 हे वर्ष देशातील आयटी कंपन्यांसाठी चांगले राहिले आहे.
कोरोना संकटाच्या काळात आयटी सेवांची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील 15.5 टक्के वाढ गेल्या दशकातील कोणत्याही वर्षातील सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग संस्थेच्या मते, 2020-21 मध्ये आयटी क्षेत्राचे उत्पन्न 2.3 टक्क्यांनी वाढून 194 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. या कंपन्यांनी रोजगारही निर्माण केले आहेत. आता पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळाली आहे. आगामी काळात जर कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली तर त्यांना कोरोनाच्या या संकटात मोठा दिलासा मिळेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळेल खुशखबर..! जाणून घ्या, सरकार कोणता निर्णय घेण्याच्या विचारात ?