Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हवाई उड्डाणाच्या स्वप्नांना झटका..! सर्वसामान्यांचे विमान जमिनीवर; पहा, नेमके काय घडलेय..?

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जेट इंधनाच्या किमती सुद्धा भडकल्या आहेत. बुधवारी, एटीएफ (jet fuel) ची किंमत 5.2 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या विमान इंधनाच्या किंमती सर्वाधिक पातळीवर आहेत. ही परिस्थिती पाहता विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्या तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडले तर विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र आणखी झटका बसणार आहे.

Advertisement

अहवालानुसार, जेट इंधनाच्या किमती वाढणे सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांत देशात चौथ्यांदा जेट इंधनाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे दिल्ली आणि मुंबईत जेट इंधनाच्या नव्या किमतींनी खळबळ उडाली आहे. ऑगस्‍ट 2008 मध्‍ये एटीएफची किंमत 71,028.26 रुपये प्रति किलोलिटर होती, तर कच्च्या तेलाच्या किमती शिखरावर होत्या.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या मते, या बदलानंतर राजधानी दिल्लीत जेट इंधनाची नवीन किंमत 90,519.79 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. आतापर्यंत तो 4,481.63 रुपये प्रति किलोलिटर होता. मुंबईतील जेट इंधनाच्या नवीन किमतीबद्दल सांगितले तर ते येथे 88,987 रुपये प्रति किलोलीटरवर आले आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम एकीकडे विमान इंधनावर दिसून येत असून त्याची किंमत आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जागतिक पातळीवर सध्या महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे भाग पडले आहे. त्याचा परिणाम विमानाच्या इंधनावरही झाला आहे. विमानाच्या इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. चौथ्यांदा हे दर वाढले आहेत. त्यामुळे आता विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. कंपन्यांना त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. त्यामुळे भविष्यात विमान तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोरोनाने दिलाय तब्बल 24 हजार कोटींचा फटका; ओमिक्रॉनमुळे एअरलाइन्स कंपन्यांचे टेन्शन वाढले

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply