Take a fresh look at your lifestyle.

.. तर ‘तशा’ पद्धतीने चीनला बसेल जोरदार झटका; पहा, सरकारने कोणता निर्णय घेणे गरजेचे..?

मुंबई : सेमीकंडक्टर, फार्मा आणि कृषी उत्पादनांसह इतर वस्तूंसाठी इतर देशांकडील आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने गेल्या वर्षी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना सुरू केली होती. आयात कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्यासाठी परदेशी आणि स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहित करणे हा त्याचा उद्देश आहे.

Advertisement

एसबीआय रिसर्चने एका अहवालात म्हटले आहे की, पीएलआय योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला तसेच देशांतर्गत उत्पादनाला चालना दिल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. पीएलआय योजनेंतर्गत, सरकार विविध पद्धती अमलात आणून चीनकडील विविध वस्तू आयात (import) तब्बल 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की आयात अवलंबित्व कमी केल्याने देशाच्या जीडीपीलाही गती मिळेल आणि ती $20 अब्ज पर्यंत वाढू शकते. त्यात पुढे म्हटले आहे, की 2020-21 मध्ये चीनबरोबर व्यापार तूट कमी करण्यात देश यशस्वी झाला होता, परंतु देशाच्या एकूण आयातीमध्ये चीनचा वाटा 16.5 टक्के दराने वाढत आहे.

Advertisement

अहवालानुसार, 2020-21 मध्ये, चीनमधून 65 अब्ज डॉलर आयात होती. यामध्ये सुमारे $ 39.5 अब्ज डॉलर किंमतीच्या विविध प्रकारच्या वस्तू होत्या. कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फार्मा आणि रासायनिक क्षेत्रातील उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने PLI योजना जाहीर केल्या आहेत. PLI योजनांमुळे चीनमधून होणारी आयात 20 टक्क्यांनी कमी करू शकलो, तर देशाचा GDP (Gross Domestic Product) 8 अब्ज डॉलरने वाढू शकतो.

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत भारताने चीनकडून $68 अब्ज किमतीची उत्पादने आयात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, कोरोना संकटात गेल्या वर्षी भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत (export) वाढ झाली होती. गेल्या वर्षात चीनला निर्यात 34 टक्क्यांनी वाढून $22.9 अब्ज झाली. कोरोनाआधी 2019 मध्ये ही निर्यात 17.1 अब्ज डॉलर होती.

Advertisement

भारताला टक्कर देण्यासाठी चीन बदलणार प्लान..? ; पहा, चीन काय करणार शेजारी देशात..?

Advertisement

भारतीयांनी दिलाय चीनला ‘असा’ही झटका; पहा कशा पद्धतीने मुजोर चीन होत आहे घायाळ..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply