मुंबई : कधीकाळी मोबाइलच्या दुनियेत फक्त नोकिया कंपनीचेच नाव होते. फोन म्हटला की नोकियाचाच असे समीकरण तयार झाले होते. मात्र, कंपनी काळानुसार बदलली नाही. तंत्रज्ञानातील बदल आत्मसात केले नाहीत. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, की नोकिया नावही कुणाला आठवत नाही. सॅमसंग, अॅपल, शाओमी, ओप्पो, व्हीवो या कंपन्यांची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. या कंपन्या आज आघाडीवर आहेत. असे असले तरी नोकिया कंपनी पुन्हा स्पर्धेत येण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने आजच्या जमान्यातील काही दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत.
HMD Global ने नोकिया G11 हा नवा जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. कंपनीचा हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन तीन दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ, 90Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. कंपनीचा हा नवीनतम स्मार्टफोन सुरुवातीला UAE आणि UK मध्ये उपलब्ध करून दिला जाईल. त्याची किंमत सुमारे 10,200 रुपये आहे आणि त्याची विक्री मार्चमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. Nokia G11 दोन रंगात येतो. या फोनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊ या..
फोनमध्ये, कंपनी 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंच HD+ डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि तो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने हा फोन 3 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Unisoc T606 सेट दिला जात आहे.
512 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 13 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज, हा फोन 5,050mAh बॅटरीने समर्थित आहे, जो 18W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
Nokia चा धमाका..! लवकरच एन्ट्री घेणार जबरदस्त स्मार्टफोन.. फिचरही आहेत एकदम खास