ज्याचा अंदाज होता ‘ते’ घडलेच..! 1 लिटर पेट्रोल मिळतेय 160 रुपयांना; पहा, कुठे उडालाय महागाईचा भडका..
मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानने (pskistan) आपल्या जनतेला पुन्हा एकदा भयानक महागाईची भेट दिली आहे. होय, पाकिस्तान सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या (petroleum products) किमती 10 ते 12 रुपयांनी वाढ केल्या आहेत.
पाकिस्तान सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 12.03 रुपये आणि हायस्पीड डिझेलच्या (High Speed diesel) दरात 9.53 रुपये प्रति लिटरने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय साधे डिझेल तेलाच्या दरात (light diesel oil) प्रतिलिटर 9.43 रुपयांनी तर रॉकेलच्या दरात 10.08 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सरकार लवकरच पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार, सरकारने अखेर दरवाढ केली आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत नव्याने वाढ केल्यानंतर भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 147.82 रुपये वरून 159.86 रुपये आणि हायस्पीड डिझेलची किंमत 144.622 रुपयांवरून 154.15 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय साध्या डिझेल तेलाची किंमत प्रति लिटर 114.54 रुपये वरून 123.97 रुपये झाली आहे. रॉकेल तेलाचे दर प्रतिलिटर 116.48 रुपयांवरून 126.56 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
इतकेच नाही तर पाकिस्तान सरकारने विमानात वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनाच्या (jet fuel) किमतीही प्रचंड वाढ केल्या आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, JP-1 च्या किमती प्रति लीटर 11 रुपयांनी वाढ केल्यानंतर त्याची किंमत 140.65 रुपये प्रति लीटर झाली आहे. JP-8 च्या किमतीत 7 रुपयांनी वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 135.72 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय ई-10 इंधनाच्या (ethanol petrol) किमतीतही 10 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यानंतर त्याची किंमत 157.35 रुपये प्रति लीटर झाली आहे.
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत झालेल्या ताज्या वाढीनंतर येथील पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलियम उत्पादनांच्या नवीनतम किंमती मंगळवारी (16 फेब्रुवारी) मध्यरात्री ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सतत वाढत आहे. बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 रोजी, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $ 93.18 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
बाब्बो.. तर पेट्रोल प्रथमच जाईल 150 पार.. पहा, कुठे उडालाय महागाईचा भडका..?