Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर..! आज आहे स्वस्त सोने खरेदीची संधी.. पहा, एकाच दिवसात किती घटलेत सोन्याचे भाव ?

मुंबई : सध्या सोन्याच्या दरात सातत्याने कमी जास्त होत आहेत. काल सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली होती, त्यानंतर सोन्याचा दर 50 हजारांच्या पुढे गेला होता. आता मात्र एकाच दिवसात सोन्याचा दर थेट 850 रुपयांनी खाली आला आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. त्याच बरोबर चांदीचे दरही आज कमी झाले आहेत.

Advertisement

एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी कमी होऊन 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 62,892 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज मात्र सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचे परिणाम सोन्याच्या दरावर होत असतात.

Advertisement

सध्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा भडका उडाला आहे. तसेच युक्रेन आणि रशियातील तणावामुळे संपूर्ण जगालाच काळजीत टाकले आहे. या सर्वांचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे. काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. याआधी सलग सात दिवस सोन्याचे दर वाढत होते. आज मात्र हा ट्रेंड बदलल्याचे दिसत आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. यानंतर दिवसभरात सोन्याचे दर आणखी बदलू शकतात.

Advertisement

दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

Loading...
Advertisement

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

Advertisement

सोन्याला झळाळी कायम.. गुंतवणुकदारांसाठी सोने खरेदीची मोठी संधी..!

Advertisement

सलग सातव्या दिवशीही सोन्याची चमक कायम..! सोन्याने ‘तो’ टप्पाही पार केला; पहा, काय आहेत नवीन दर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply