Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

1 किलो चहासाठी मोजले 1 लाख..! पहा Golden Pearl’ tea ची नेमकी काय आहे खासियत

मुंबई : भारतातील बहुतेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाने (Tea) होते. तसेच बाजारात कुठेही गेलात तर प्रत्येक कोपऱ्यात एक कप चहा देणारे दुकान, हॉटेल किंवा टपरी मिळेल. अशावेळी साधारणपणे बाजारात चहाची पत्ती 500 रुपये/किलो दराने मिळते. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुवाहाटी येथे (आसाम) एक किलो चहाच्या पानांचा लिलाव झाला आणि त्यासाठी एकाने चक्क किंमत 99,999 रुपये इतकी किंमत मोजली. देशातील चहाच्या पानांसाठी ही सर्वात महागडी बोली आहे. ही बोली गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्रात (GTAC) (जीटीएसी) घेतली जात आहे. हा गोल्डन पर्ल चहा (Golden Pearl’ tea) आहे. ज्याला इतकी पसंती मिळाली आहे.

Advertisement

आसाममधील दिब्रुगढ येथील ही खास चहाची पाने आहे. आसाम टी ट्रेडर्सने या चहाच्या पानासाठी 99,999 रुपयांची बोली लावली आहे. आसाम टी ट्रेडर्स हे आसाममधील हाय स्पेशालिटी चहाचे सर्वात मोठे खरेदीदार म्हणून ओळखले जातात. या लिलावात अनेक चहा कंपन्यांनी भाग घेतला होता, मात्र गोल्डन पर्ल टीला सर्वाधिक बोली लागली. दोन महिन्यांपूर्वी 14 डिसेंबर 2021 रोजी, गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्रातील मनोहरी चहाच्या इस्टेटमधून मनोहारी गोल्ड चहाच्या (Manohari Gold) पानांसाठी 99,999 रुपयांची बोली देखील लावण्यात आली होती. गोल्डन पर्ल टीची मालकी एएफटी टेक्नो ट्रेडकडे (AFT Techno Trade)  आहे. GTAC सचिव प्रियनुज दत्ता यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, गोल्डन पर्ल टी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील नाहोरचुकबारी कारखान्यात तयार केला जातो. ते म्हणाले की, गोल्डन पर्ल टी विक्री क्रमांक-7 आणि लॉट क्रमांक- 5001 मध्ये लिलावात देण्यात आली होती.

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply