Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भारताने दिलेय की तब्बल 40 हजार मेट्रीक टन इंधन; पहा, कोणता देश सापडलाय संकटात..?

मुंबई : भारताने मंगळवारी श्रीलंकेला 40,000 मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा केला आहे. यामुळे श्रीलंकेसमोरील ऊर्जा संकट कमी करण्यात मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा श्रीलंकेचा खरा मित्र आहे. भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी इंडियन ऑइल कंपनीकडून 40,000 मेट्रिक टन इंधनाची खेप श्रीलंकेला सुपूर्द केली आहे.

Advertisement

परकीय चलन साठा कमी झाल्यामुळे आर्थिक संकटात तातडीच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेने भारतातील प्रमुख तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) कडून 40,000 मेट्रिक टन डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी, ऊर्जा मंत्री उदय गमनापिला आणि गोपाल बागले कोलंबो बंदरावर होते जिथे तेल टँकरने मोठी खेप पोहोच केली आहे. वितरणानंतर, आयोगाने सांगितले, की भारत-श्रीलंका भागीदारी श्रीलंकेतील ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्य करत राहील.

Advertisement

जानेवारीमध्ये, देशातील जवळजवळ सर्व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असताना भारताने श्रीलंकेला त्याच्या कमी होत चाललेल्या परकीय चलन साठा आणि अन्न आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी 900 दशलक्ष डॉलर कर्जाची घोषणा केली होती. श्रीलंकेसाठी आर्थिक मदत पॅकेजने या देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीलंकेच्या परकीय चलनसाठ्यात (foreign reserve) घट झाल्याने देशास अन्न टंचाईचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे वीज आणि इंधनाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.

Advertisement

या महिन्याच्या सुरुवातीला, तत्काळ आर्थिक मदत पॅकेजचा भाग म्हणून श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलर क्रेडिट लाइन विस्तारित करण्याचा करार झाला. श्रीलंकेत अत्यावश्यक वस्तू टंचाई निर्माण झाली कारण या वस्तू खरेदी करण्यासाठी या देशाकडे परकीय चलन नव्हते.

Loading...
Advertisement

दरम्यान, श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. तर परकीय चलनाचा साठाही जवळपास रिकामा झाला आहे. या वाईट परिस्थितीत, श्रीलंका सरकारने 1.2 अब्ज डॉलर आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, श्रीलंकेवर हे संकट का आले याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर यासाठी चीन काही प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आता या देशाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि दिवाळखोरी होऊ नये, यासाठी सोन्याची विक्री सुरू केली आहे. असे करून हा देश आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

सोने विकून देखील आर्थिक संकट अद्याप मिटलेले नाही. त्यामुळे या देशाला भारताकडून आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या सरकारने भारताकडून 1.5 अब्ज डॉलर मदत मिळण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले होते.

Advertisement

बाब्बो.. पेट्रोल-डिझेलसाठी भारत देणार तब्बल 50 कोटी डॉलरचे कर्ज.. पहा, काय आहे नेमका प्रकार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply