Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनाच्या संकटातही आयटी कंपन्यांनी केलीय बक्कळ कमाई; पहा, किती पैसे कमावलेत..?

दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे याच काळात देशातील आयटी कंपन्यांची मात्र चांदी झाली आहे. होय, या घातक संकटाच्या काळातही कंपन्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. 2021-22 मध्ये 15.5 टक्के वाढीसह देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्पन्न 227 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. ही वाढ गेल्या दशकातील कोणत्याही आर्थिक वर्षातील सर्वाधिक आहे. आयटी उद्योगातील संघटना नासकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले, की 2021-22 हे वर्ष देशातील आयटी कंपन्यांसाठी चांगले राहिले आहे.

Advertisement

कोरोना संकटाच्या काळात आयटी सेवांची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील 15.5 टक्के वाढ गेल्या दशकातील कोणत्याही वर्षातील सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग संस्थेच्या मते, 2020-21 मध्ये आयटी क्षेत्राचे उत्पन्न 2.3 टक्क्यांनी वाढून 194 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

Advertisement

नासकॉमच्या अहवालानुसार, IT उद्योगाने एकूण थेट कर्मचारी संख्या 50 लाखांवर नेण्यासाठी 4.5 लाख नवीन रोजगार जोडले. देशातील आयटी कंपन्यांच्या निर्यातीतील उत्पन्न 17.2 टक्क्यांनी वाढून $178 अब्ज झाले, तर देशांतर्गत उत्पन्न 10 टक्क्यांनी वाढून $49 अब्ज झाले. घोष म्हणाले की, आयटी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा हिस्सा 25 टक्क्यांनी वाढून $13 अब्ज झाला आहे. भविष्यातील तंत्रज्ञानासाठी देशाकडे मजबूत कार्यबळ आहे.

Loading...
Advertisement

अहवालानुसार, आयटी क्षेत्रातील रोजगार सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचले आहे. उद्योग संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णन रामानुजन यांनी सांगितले की, डिसेंबरच्या तिमाहीतील टॉप-10 आयटी कंपन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसते, की रोजगार सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नाही तरीही ते स्थिर आहे. नासकॉमच्या म्हणण्यानुसार, जगभरातील डिजिटलीकरणाची मागणी वाढल्यामुळे अलीकडच्या तिमाहीत, अनेक कंपन्यांनी 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी रोजगार सोडल्याची नोंद केली आहे.

Advertisement

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने कंपन्यांची चांदी; गुंतवणूकदारांनीही केलीय बक्कळ कमाई; पहा, कसा बदललाय ट्रेंड

Advertisement
Advertisement

Leave a Reply